पिंपरी: राज्यातील वारकरी संप्रदाय आणि नागरिक, भाविकांचे श्रद्धास्थान इंद्रायणी नदी विकासासाठी प्राधान्याने कामे हाती घेऊन केंद्रे सरकार, राज्य शासन तसेच सर्वांच्या सहकार्याने इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्याची ग्वाही देत आळंदी देवस्थानचे ज्ञान भूमी प्रकल्पास गती देऊन भक्त निवासाचे काम हाती घेण्यास २५ कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागाचे माध्यमातून देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित दीपोत्सव, इंद्रायणी नदी पूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. आळंदीत तत्पूर्वी ज्ञानोबा माउली, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल हरिनाम गजरात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा वैभवी रथोत्सव शुक्रवारी ( दि.९ ) भाविक, वारक-यांचे हरिनाम गजरात झाला. रथोत्सवाला श्रींचा चांदीचा मुखवटा पूजा ,आरती दर्शनास भाविकांनी गर्दी केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायण सोहळ्या निमित्त या रथोत्सव – दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
आज इथे बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त व्हावी. राज्य शासनाने देखील हे काम मनावर घेतले असून इथे एसटीपी उभारून त्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येईल. केंद्र आणि राज्य शासनासोबतच वारकऱ्यांची देखील याकामी मदत… https://t.co/npFDQUycIZ pic.twitter.com/0ulnePQqwd
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 9, 2025