पुणे : दीपावली पाडव्याचे औचित्य साधून शेवाळेवाडी येथे राजे क्लबच्यावतीने हनुमान मंदिरात दिपोस्तव साजरा करण्यात आला. महाराजांची रेखीव रांगोळी, फुलांची सजावट व दिव्यांच्या रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता.
रांगोळी व फुलांची सजावट अर्चना पवार, फाल्गुनी पडवळकर, अंकिता पवार, प्रांजल सुर्वे, दिशा चौधरी, संजू पडवळकर, सागर नाटिकर, विराज बोडके व आर्यन पवार यांनी केली. माजी उपसरपंच व राजे क्लबचे संस्थपाक अध्यक्ष अमित पवार यांनी स्वागत केले.
यावेळी मांजरीचे सरपंच शिवराज घुले, राष्ट्रवादी महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, मांजरीचे माजी उपसरपंच प्रमोद कोद्रे, योगिता घुले, हेमलता पडवळकर, माधुरी मोरे, दीपक ढोरे, आकाश पवार, रवी गोगड, अशोक धोंडगे, सुरेश गवळी, अरुण चव्हाण, संतोष भंडारी, प्रा. विजय सोनवणे, नागराज कुंदन, सोमनाथ बागवे, अंजना शेवाळे, अमित शेवाळे, बबन जगताप, संतोष कदम, राहुल भापकर, सचिन भापकर, महेश भंडारी, मोहसीन आतार,विष्णू शिंदे, विक्रम कापरे, मंगेश रसाळ, वैभव चव्हाण, अमर भापकर, रोहित तुपे आदी उपस्थित होते.
राजे क्लब नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबवित आहे. परिसरातील नागरिकांसमवेत दीपोत्सव साजरा केल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला, असे क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमित पवार यांनी सांगितले.