Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित

शेखर बापू रणखांबे यांचा आगामी चित्रपट 'रुबाब' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना नवी कथा पाहायला मिळणार आहे. ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ हे पाहिलं गाणं प्रदर्शित झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 07, 2026 | 02:16 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक
  • ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित
  • स्टायलिश प्रेम कहाणी पण हटके अंदाजात
 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘रुबाब’ च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही हटके टॅगलाईन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून चित्रपटाबद्दलची चर्चा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या रुबाबदार आणि स्टायलिश लव्हस्टोरीतील पहिलं प्रेमगीत ‘कसं तरी होतंया रं’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!

‘कसं तरी होतंया रं’ या गाण्यात अभिनेता संभाजी ससाणे आणि अभिनेत्री शितल पाटील यांच्या पहिल्या प्रेमातील निरागस, हळवे आणि गोड क्षण अत्यंत सुंदरपणे मांडण्यात आले आहेत. प्रेमात पडल्यावर मनात निर्माण होणारी धडधड, नजरानजरेतून उमटणारी ओढ, हळूच उमलणारे भाव या सर्व भावना या गाण्यात अतिशय सुरेख पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत.

 

या रोमँटिक गाण्याला बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक जावेद अली आणि सोनाली सोनवणे यांच्या आवाजाची जादू लाभली आहे. या गाण्याचे गीतकार मंगेश कांगणे यांच्या शब्दांनी गाण्याला अधिक भावनिक खोली दिली आहे. तर चिनार–महेश यांच्या संगीतामुळे हे गाणं ऐकताना प्रेमाच्या विश्वात लोक नक्की हरवून जातील. चिनार-महेश यांनी ‘बालक-पालक’, ‘टाईमपास’, ‘धर्मवीर’सारख्या सुपरहिट चित्रपटांना संगीत दिले होते. आता ‘रुबाब’च्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी कमाल अल्बम घेऊन आले असून प्रेक्षकांना त्यांच्या संगीताची जादू अनुभवायला मिळणार आहे.

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत

हा चित्रपट आणि गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणाले, “‘रुबाब’ हा आजच्या पिढीच्या प्रेमकथेचा ठाम आवाज आहे. या गाण्यातून या रुबाबदार लव्हस्टोरीची भावनिक सुरुवात होते. पहिल्या प्रेमातील गोंधळ, उत्सुकता आणि ओढ या सगळ्या भावना आम्ही प्रामाणिकपणे या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.” झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत. तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Marathi film rubab love song kas tari hotaya ran to be released to the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: “माझ्या आईच्या पायावर जोरात काठी मारली!” मढीत वाहतूककोंडीमध्ये पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?
1

Ahilyanagar News: “माझ्या आईच्या पायावर जोरात काठी मारली!” मढीत वाहतूककोंडीमध्ये पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?

Ahilyanagar News: उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापौर ज्योती गाडे संतापल्या; विभागप्रमुखांनाही सवाल
2

Ahilyanagar News: उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापौर ज्योती गाडे संतापल्या; विभागप्रमुखांनाही सवाल

Kolhapur Gas Shortage :  सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी
3

Kolhapur Gas Shortage : सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी

Sangali News : शिक्षण घ्यावं तरी कसं ? 42 शिक्षक पदं रिक्त; दोन-तीन तुकड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल
4

Sangali News : शिक्षण घ्यावं तरी कसं ? 42 शिक्षक पदं रिक्त; दोन-तीन तुकड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.