Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: उंबरे परिसरात रिक्षा-मिनीबसचा अपघात! 3 जणांचा जागीच मृत्यू

राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात मंगळवारी रिक्षा आणि मिनीबसचा अपघात झाला, ज्यात 3 जणांना आपला जीव गमवावा लागला.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 07, 2026 | 07:36 PM
Ahilyanagar News: उंबरे परिसरात रिक्षा-मिनीबसचा अपघात! 3 जणांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: उंबरे परिसरात रिक्षा-मिनीबसचा अपघात! 3 जणांचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • राहुरी तालुक्यात उंबरे परिसरात अपघात
  • रिक्षा-मिनीबसचा अपघात
  • 3 जण जागीच ठार तर 10 ते 12 जण किरकोळ जखमी
राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात मंगळवारी सायंकाळी तीनचाकी रिक्षा आणि खासगी ट्रॅव्हल्स मिनीबस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रिक्षातील एक जण गंभीर जखमी झाला असून, मिनीबसमधील दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात दीपक जगन डावखर, आकाश मनोहर डावखर आणि दीप विजय जाधव (तिघेही रा. इगतपुरी, जि. नाशिक) यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ४.१५ वाजता नाशिक येथील काही तरुण तीनचाकी रिक्षामधून (MH 15 AJ 1133) शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी शिंगणापूरहून राहुरीकडे येणारी खासगी ट्रॅव्हल्स मिनीबस (MH 04 LK 7254) उंबरे परिसरातील तांबे पेट्रोल पंपाजवळ आली. ऊसाच्या ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मिनीबसने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोराची धडक दिली.

PUNE NEWS : पुणे डाक विभागात डिजिटल पेमेंटचा वेग; तीन महिन्यांत ३.८८ कोटींचा महसूल

धडकेनंतर मिनीबस रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की रिक्षातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर आणि एक जण किरकोळ जखमी झाला. मिनीबस मधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उशिरापर्यंत जखमींची नावे समजू शकली नव्हती. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

अपघाताचे संभाव्य कारण

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मिनीबस ऊसाच्या ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला. काही नागरिकांच्या मते, बसचा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला असावा. पोलिसांकडून नोंद झाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

’10 कर्मचारी भाजले अन् 6 जण…’; दौंडच्या हॉटेल जगदंबामध्ये नेमके घडले काय?

स्थानिक तरुणांचे मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. राहुरी येथील भागवत वराळे, बाळासाहेब वराळ, प्रथमेश वराळे, आकाश लहांनगे, सचिन जाधव यांच्यासह रुग्णवाहिका चालकांनी जखमींना तात्काळ राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना नगर येथे हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन तरुणांना मृत घोषित केले. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Web Title: Ahilyanagar news mini bus and auto rickshaw accident in umbare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 07:36 PM

Topics:  

  • Accident
  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.