मोठी बातमी! देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर अखेर भाजपवासी; फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेस हाय कमांडच्या रडारवर आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर देगलूर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी अधिकृतरीत्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. आज भाजप कार्यालयात भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जितेश अंतापूरकर यांनी अधिकृत प्रवेश केला आहे.
दरम्यान काँग्रेसचे देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”जितेश यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर हे आमच्यासोबत विधानसभेत देखील होते. मात्र त्यांच्या दुःखद निधनानंतर जितेश त्या जागी निवडून आले. मात्र काँग्रेस पक्षात त्यांना जो अनुभव आला त्याबद्दल अशोक चव्हाण बोलले. भाजपचे अनेक नेते नांदेडमध्ये वर्षानुवर्षे जिल्ह्यात काम करत आहेत. जितेश अंतापूरकर यांच्या पवर्षामुळे पक्ष अधिक मजबूत होत आहे. भारतीय जनता पक्षात काम करण्याचा संकल्प त्यांनी केला यासाठी मी त्यांचे आभार मानतो.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ”नांदेड लोकसभेची जागा आपण फार कमी मतांनी हरलो. फेक नॅरेटिव्ह आणि अनेक गोष्टीमुळे आपण ती जागा हरलो. लवकरच अशोक चव्हाण यांचे इतर सहकारी देखील भाजपमध्ये प्रवेश करतील. तसेच या विधानसभेमध्ये महायुती आणि भाजप नांदेडमध्ये ठरेल असा मला विश्वास आहे.”
🕗 7.48pm | 30-8-2024📍Mumbai.
LIVE from BJP Maharashtra HQ, Mumbai#Maharashtra #Mumbai #BJP https://t.co/pLlEtqU60d
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 30, 2024
विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांचा समावेश असल्याचा काँग्रेस नेत्यांना विश्वास होता. त्यानंतर काँग्रेसकडून फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय़ही घेण्यात आला. पण काँग्रेसने वेगळाच डाव टाकला. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांर कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निव़डणुकीत त्यांना तिकीट दिले जाऊ नये, असा आदेशच हायकमांडकडून आला. त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.