Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदेड मनपाच्या पहिल्या सभेला १६ तारखेचा मुहूर्त; स्थायी समिती, शिक्षण समिती सदस्यांची निवड होणार

नांदेड महापालिकेची येत्या सोमवारी म्हणजे दि.१६ मार्च रोजी महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सभेस सुरूवात होणार आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर केवळ चार विषय ठेवण्यात आले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 10, 2026 | 05:04 PM
Nanded Municipal Corporation to hold first meeting on March 16 to decide on standing committee

Nanded Municipal Corporation to hold first meeting on March 16 to decide on standing committee

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त मिळाला आहेे. येत्या सोमवारी म्हणजे दि.१६ मार्च रोजी महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सभेस सुरूवात होणार आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर केवळ चार विषय ठेवण्यात आले आहेत. स्थायी समितीच्या १६ तर महिला बालकल्याण समितीच्या ११ सददस्यांची निवड या सभेत केली जाणार आहे. तौलनिक संख्याबळानुसार भाजप, शिवसेना महायुतीचे १० सदस्य निवडले जाणार असून काँग्रेस वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचे प्रत्येकी ३ सदस्य राहणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्ष नगरसेवकास स्थायी समितीत संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिला सभेत स्व. अटलजींचे स्मरण, पुर्णाकृती पुतळा उभारला जाणार

भाजपाने निवडणुकीच्या संकल्पनाम्यात स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुणर्णाकृती पुतळा उभारण्याचे जाहीर केले आहे, त्या अनुषंगाने वचनपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याचे काम भाजपाने केले आहे. स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्याचा ठराव मनपाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत घेण्यात येत असून माजी सभापती किशोर स्वामी, उपमहापौर दिपकसिंह रावत, सभागृह नेते अॅड. महेश कनकदंडे हे या ठरावाचे सूचक आहेत, तर नगरसेविका शांभवी साले, विरेंद्रसिंघ गाडीवाले हे अनुमोदक आहेत. संकल्पपूर्तीच्या दिशेने भाजपने पहिले पाऊल टाकले आहे.

हे देखील वाचा :  TETमध्ये इंग्रजी सक्तीची करा! मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी पळवाटा रोखण्यासाठी परिपत्रक

महिला बालकल्याण समितीत ११ सदस्य

महिला व बालकल्याण तसेच शिक्षण समितीत भाजप, शिवसेना युतीचे सात तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचे प्रत्येकी २ सदस्य निवडले जाणार आहेत. स्थायी समितीवर तसेच महिला व बालकल्याण समितीवर कोणत्या सदस्यांची वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गटनेत्यांकडून नावांची यादी महापौरांकडे सुपूर्द केली जाणार असून त्यानंतर महापौरांकडून सदस्यांची नावांची घोषणा केली जाणार आहे.

हे देखील वाचा : नागरिकांनो.. गोडधोड पदार्थ सुरक्षित आहेत काय? सणाच्या मुहूर्तावर भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट

‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा

नांदेड-लातूर थेट रेल्वे जोडणारा प्रकल्प नसून, ही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही विभागांना रेल्वे मार्गे जवळच्या अंतराने जोडणारी एक महत्त्वाची ‘मिसिंग लिंक’ असल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी देण्याची मागणी आज राज्यसभेत मांडताना ते बोलत होते. शून्य प्रहरात काळात हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, नांदेड आणि लातूर ही मराठवाड्यातील कृषी व व्यापाराची मोठी केंद्रे आहेत. मात्र, या
नांदेड-लातूर रेल्वे प्रकल्पाबाबत खा. चव्हाण आग्रही दोन शहरांत अद्याप थेट रेल्वे मार्ग नाही. सध्या रेल्वेने २१२ किमीचा वळसा घालून जाण्यासाठी ६ तास लागतात, तर रस्ते मार्ग १४४ किमीचा आहे. प्रस्तावित १०४ किमीच्या नवीन थेट रेल्वे मार्गामुळे हा प्रवास अवघ्या सव्वा तासात पूर्ण होणे शक्य आहे. ही मिसिंग लिंक पूर्ण झाल्यास विदर्भातील नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रात मिरज या दोन मोठ्या रेल्वे जंक्शनमधील अंतर ९९१ किमीवरून ८०७ किमीवर येईल. म्हणजेच सुमारे १८४ किमीचे अंतर कमी होईल, याचा थेट फायदा विदर्भ आणि शेजारील छत्तीसगड, मध्यप्रदेशातील बिलासपूर व जबलपूर सारख्या शहरांना पश्चिम किनारपट्टीकडे जाण्यासाठी होईल, असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

Web Title: Nanded municipal corporation to hold first meeting on march 16 to decide on standing committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • nanded news
  • Nanded Politics
  • political news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
3

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.