Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar : तू विकास कुठे केलाय ते तरी मला दाखव; अजित पवारांचं भाजपच्या आमदाराला आव्हान

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार राहुल कुल यांचे नाव न घेता त्यांचे कान टोचले आहेत. सर्व नगरसेवकांना निवडून द्या, मग विकास काय असतो ते मी करुन दाखवतो, असे आश्वासन पवार यांनी यावेळी बोलताना दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 30, 2025 | 05:09 PM
तू विकास कुठे केलाय ते तरी मला दाखव; अजित पवारांचं भाजपच्या आमदाराला आव्हान

तू विकास कुठे केलाय ते तरी मला दाखव; अजित पवारांचं भाजपच्या आमदाराला आव्हान

Follow Us
Follow Us:
  • दौंडचे व्यापारी शहर सोडून गेले
  • तू विकास कुठे केलाय ते तरी मला दाखव
  • अजित पवारांचं भाजपच्या आमदाराला आव्हान
दौंड/राजेंद्र झेंडे : दौंडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर कोणतरी प्रत्येक समाजावर दहशत निर्माण करीत आहे, दमदाटी आणि धमकीची भाषा वापरत आहेत, कोणीही असल्या धमक्यांना घाबरायचं काम नाही, मी तुमच्या पाठीशी उभा आहे, अशी टीका करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार राहुल कुल यांचे नाव न घेता त्यांचे कान टोचले आहेत. दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभा रविवारी ( दि ३०) दौंड शहरात पार पडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केले.

अजित पवार म्हणाले , आमच्या पक्षाचे उमेदवार बारामतीत निवडणूक लढवीत आहेत. मात्र मी त्या ठिकाणी कोणाला धमकी दिली, दहशत केली नाही. पोलीसांना सांगतो हे तीन पक्षाचे सरकार आहे. कायदा कुणी हातात घेत असेल, त्याला कायदा काय असतो हे दाखवून द्या. दौंडमध्ये कोण दमदाटी करीत असेल तर कायद्याने त्याला जरब बसलाच पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. मी बारामतीचा विकास करून दाखवला, मी विकास कामांना महत्त्व देतो, तुम्ही कधीही पहाटे आला तरी तुम्हाला नगरपालिकेतील कर्मचारी काम करताना पाहायला मिळेल. त्यामुळे कोल्हापुरातील लोक बारामतीला राहायला येतात. बारामतीचे एसटी स्टँड पहा आणि दौंडचे एसटी स्टँड पहा, अशा लोकांना का संधी देता? दौंडचे व्यापारी शहर सोडून गेले हे कुणाचे अपयश आहे? तू विकास कुठे केलाय ते तरी मला दाखव, असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार राहुल कुल यांना दिलं आहे. अशा लोकांना तुम्ही का निवडून देता? असा मिश्किल प्रश्न त्यांनी दौडकरांना विचारला.

मी दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे केलेले नगराध्यक्ष आणि इतर सर्व नगरसेवकांना निवडून द्या, मग विकास काय असतो ते मी करुन दाखवतो, असे आश्वासन पवार यांनी यावेळी बोलताना दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि दौंड शुगर चे संचालक वीरधवल जगदाळे, माजी नगरसेवक इंद्रजीत जगदाळे, माजी आमदार रमेश थोरात, ज्येष्ठ नेते नंदू पवार, शिवसेनेचे नेते राजन खट्टी, वंचित बहुजन आघाडीचे नेते अश्विन वाघमारे, नगराध्यक्ष च्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Deputy chief minister ajit pawar has criticized the bjp mla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Daund News
  • Rahul Kul

संबंधित बातम्या

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा
1

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन
2

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
3

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.