
फोटो सौजन्य: Gemini
या कार्यक्रमांतर्गत उर्ध्व प्रवरा (निळवंडे) प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील मुख्य रस्ता पुलाचे बांधकाम, तसेच जलसंपदा व लघु पाटबंधारे विभागामार्फत निळवंडे डाव्या कालव्यावरील निमगाव भोजापूर, सायखिंडी, वेल्हाळे, घुलेवाडी, खांजापूर, कुरण, तळेगाव आदी ठिकाणांवरील दहा लोखंडी पुलांचे लोकार्पण होणार आहे. यासाठी 4 कोटी 58 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
Navi Mumbai Election : नवी मुंबईत आढळले 13,336 दुबार मतदार
तळेगाव येथे 1 कोटी 60 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, मालदाड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे लोकार्पण (17 कोटी 29 लाख), गुंजाळवाडी येथील 1 कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. वडगाव लांडगा येथे विविध विकासकामांचे तसेच निळवंडे डावा कालव्यावरील एस्केपचे भूमिपूजन (5 कोटी 21 लाख) होणार आहे.
धांदरफळ खुर्द येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व कृषी विभागाच्या विविध योजनांचा लोकार्पण सोहळा होणार असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द या रस्त्यासाठी 6 कोटी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
धांदरफळ खुर्द येथे होणाऱ्या कार्यक्रमात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 33 लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, अवजारे व स्प्रेयरसाठी 35 लाख 25 हजार रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 8 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांप्रमाणे एकूण 16 लाख रुपये, तसेच MIDH योजनेअंतर्गत हरितगृह व शेडनेटसाठी 14 लाभार्थ्यांना 1 कोटी 53 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
‘तारा’चा अचानक बदलला मूड; 45 मिनिटांत मगरींना चकवा देत तब्बल…, चांदोलीत रंगला थरार
चंदनापुरी येथे 3 कोटी 81 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन, हिवरगाव पावसा येथे निळवंडे उजव्या कालव्यावरील 18 लोखंडी पुलांचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलांचे लोकार्पण (5 कोटी 8 लाख) होणार आहे. याशिवाय पिंपरणे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पिंपरणे ते कोळवाडी रस्त्याचे लोकार्पण (10 कोटी 64 लाख) करण्यात येणार आहे. एकूण 51 कोटी 39 लाख रुपयांच्या विकासकामांचा हा संगमनेर तालुक्यात भव्य शुभारंभ झाला आहे.