पुणे: पहलगाम दहशतवादी हल्लयानंर देशभरात संतापाचे वातावरण आहे. त्यानंतर देशातील प्रत्येक राज्यातून पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच महाराष्ट्रातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाहोता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळला आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेचा दावा फेटाळून लावला आहे.
राज्यात पाकिस्तानी नागरिक मोठ्या संख्येने आहेत. पण काही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘मी गृहमंत्री म्हणून सांगत आहे की, राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत, प्रत्येकाला त्यांच्या मायदेशी पाठवण्याची व्यवस्था केली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यत राज्यातील सर्व पाकिस्तानी नागरिक त्याच्या देशात पाठवले जातील.” सरकार पूर्णपणे सतर्क आहे आणि कोणत्याही पातळीवर निष्काळजीपणा झालेला नाही. प्रशासनाने संबंधित पाकिस्तानी नागरिकांची ओळख आणि त्यांचे निवासस्थान याची पडताळणी पूर्ण केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
कॅनडात भीषण दुर्घटना; व्हँकुव्हरमध्ये स्ट्रीट फेस्टिव्हल दरम्यान एका भरधाव कारने अनेकांना चिरडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ राज्यातील धरणांमध्ये 38 टक्के पाणीसाठा आहे. एप्रिल मे महिन्यात धरणांमध्ये पाणीसाठी कमीच असतो. गेल्या वर्षी 32 टक्केच पाणीसाठा होता. तो आता ३८ टक्के आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा आहे. पण लहान धरणे आणि तलावांमधील पाणीसाठी कमी झाला आहे. हे काही पहिल्यादा होतय असं नाही. एप्रिल मे महिन्यात हीच अवस्था असते. ”
‘पुणे महापालिकेला 75 वर्षे पूर्ण झाली. महापालिकेचे पहिले प्रशासक .गो. बर्वे यांच्या 111 व्या जंयतीनिमित्त पुणे अर्बन डायलॉ हा मंच तयार झाला आहे. यात ४ विविध तज्ज्ञ चार वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहेत. यात अर्बन प्लॅनिंग गव्हर्नन्स, आपत्ती व्यवस्थापन अशा विषयांचा समावेश आहे. त्यातून पुण्यात चॅलेंजेस आहेत. त्यावर कॉम्प्रेहेन्सिव पॉलिसी तयार करण्याचा प्रयत्न आहे. अर्बन मोबिलीटीचाही विषय आहे, या चारही विषयावर कॉम्प्रेहेन्सिव पॉलिसी तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्याचं उद्धाटन मी केलं आहे. आपल्याकडे अर्बन चॅलेजेंस कसे तयार झाले त्यावर काय उपाययोजना करता येतील, त्यावर सरकारची काय भूमिका आहे, हे सर्व मी मांडलं आहे. मला विश्वास आहे की यानंतर जो रोडमॅप तयार होईल, त्यावर सरकार काम करेल.’ असही फडणवीसांनी स्पष्ट केलं.
परदेशी गुंतवणूकदारांची भारतात जबरदस्त वापसी, या आठवड्यात शेअर बाजारात केली ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक