कॅनडात भीषण दुर्घटना; व्हँकुव्हरमध्ये स्ट्रीट फेस्टिव्हल दरम्यान एका भरधाव कारने अनेकांना चिरडले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: कॅनडात एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका भरधाव कारने अनेक लोकांना चिरडले आहे. यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (26 एप्रिल) रात्री कॅनडाच्या व्हॅंकुव्हर येथे एका स्ट्रीट फेस्टिव्हल दरम्यान दुर्घटना घडली. पोलिसांनी आरोपी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. सध्या अपघातानंतरच्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅंकुव्हरमध्ये लोक स्ट्रीट फेस्टिव्हलचा आनंदा साजरा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. एका कार चालकाने भरधाव वेगात गर्दीत घुसून अनेकांना चिरडले. स्थानिक वेळेनुसार, शनिवारी (26 एप्रिल) रात्री 8 वाजता ही घटना.
पोलिसांनी म्हटले की, कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्याची चौकशी सुरु आहे. व्हॅंकुव्हरच्या पोलिसंनी मअद्याप मृतांच्या संख्येची पुष्टी केलीली नाही.
Initial reports of several killed and over a dozen injured, after an SUV plowed into a closed-off street filled with people celebrating the Lapu Lapu Festival in Vancouver, Canada. pic.twitter.com/cLQQPfOMCq
— OSINTdefender (@sentdefender) April 27, 2025
दरम्यान सोशल मीडियावर या अपघातानंतरचे व्हिडिओ पाहायला मिळत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मृतदेह रस्त्यावर विखुरलेले दिसत आहेत. या घटनेची माहिती देताना व्हॅंकुव्हर पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर म्हटले की, व्हॅंकुव्हरमध्ये E-14 अव्हेन्यू आणि फ्रेझर येथे स्ट्रीट फेस्टिव्हल साजरा केला जात होता. या दरम्यान रात्री 8 वाजता एका अज्ञात व्यक्तीने भरधाव वेगात येऊन लोकांना धडक दिली. अनेक लोकांना चिरडण्यात आले. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान व्हॅंकुव्हरचे महापौर केन सिम यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “फिलिपिनो वारसा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करणाऱ्या लापू लापू लापू डे फेस्टिव्हलमध्ये या घटनेबद्दल दु:ख झाले.” तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेमागील हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. परंतु हा हल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच अलीकडच्या काही काळात कॅनडामध्ये अशा अनेक प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.
A number of people have been killed and multiple others are injured after a driver drove into a crowd at a street festival at E. 41st Avenue and Fraser shortly after 8 p.m. tonight. The driver is in custody. We will provide more information as the investigation unfolds. pic.twitter.com/Iqh5AK5Au3
— Vancouver Police (@VancouverPD) April 27, 2025