Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: ‘वर्षा’वर घडामोडींना वेग; फडणवीस शिंदेंच्या भेटीसाठी दाखल, काय निर्णय होणार?

Mahayuti Government: राज्यात विधानसभा निवडणूक होऊन जवळपास 10 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही महायुतीचे सरकार स्थापन झालेले नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 03, 2024 | 07:30 PM
Devendra Fadnavis,

Devendra Fadnavis,

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणूक होऊन जवळपास 10 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही महायुतीचे सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री कोण होणार हेच अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपचा मुख्यमंत्री होणार असला तरी चेहरा कोण असणार हे अजूनही स्पष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम झाल्याचे समजते आहे. मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. या दोघांमध्ये काय चर्चा होणार आहे, हे आता पहावे लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. आज त्यांच्यावर ठाण्यातील ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. महायुटीमध्ये एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी अडून बसल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान 5 तारखेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्याच दृष्टीने सरकारमध्ये कोण मंत्रीपदाची शपथ घेणार? पुढील रणनीती ठरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याचे म्हटले जात आहे. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर काही गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. भाजपची उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या या बैठकीत पक्षाचा गटनेता निवडला जाणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हेच गटनेते होण्याची शक्यता आहे. तसेच राज्याची सूत्रे त्यांच्याच हातात जाण्याची शक्यता आहे. मात्र सगळे ठरले असले त्री मुख्यमंत्री कोण होणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून एकनाथ शिंदे नाराज होते. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात गृहमंत्रीपद आणि नगरविकास खात्याची मागणी केली होती. पण कोणत्याही परिस्थितीत भाजप शिंदे गटाला गृहमंत्रीपद देण्यास तयार नव्हते.साताऱ्यातील त्यांच्या गावी निघून गेले. तिथेच एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली आणि ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. एकनाथ शिंदे  त्यानंतर काल सांयकाळी महायुतीची बैठक होणार होती. पण शिंदेंच्या प्रकृती अस्वस्थामुळे ही बैठकही रद्द करण्यात आली. आज मुंबईतील ज्युपिटर रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतरअखेर आज खातेवाटपाच्या चर्चांसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्या, उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन भेट घेतल्यानंतर शिंदे आणि भाजप यांच्यातील चर्चेची दारे पुन्हा उघडल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा: Eknath Shinde News: आजारपण पळालं, नाराजीही दूर; शिंदेंनी भाजपसोबत उघडली चर्चेची दारे

गुरुवारी (5 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे.  बैठकीत या उदय  सामंतांनी शिंदे गटाचा प्रस्ताव फडणवीसांसमोर ठेवल्याची माहिती आहे. 23 नोव्हेंबरनंतर फडणवीस आणि शिंदे गटात झालेली ही पहिलीच बैठक आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, 5 तारखेला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात  भाजपचे 16 जण शपथ घेऊ शकतात. यात रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, विखे-पाटील, गिरीश महाजन, हे शपथ घेण्याची शक्यता आहे. याशिवाय नितेश राणे आणि गणेश नाईक यांच्याही शपथविधी होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Devendra fadnavis meet to cm eknath shinde varsha bunglow formation of maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 07:21 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Mahayuti

संबंधित बातम्या

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
1

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
3

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
4

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.