Photo Credit- Social Media
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच त्यांची प्रकृतीही खालावली होती. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात दुरावा आल्याचे बोलले जात होते. दुसरीकडे महायुतीचा शपथविधीही अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. अशातच शिंदे गटाच्या वतीने भाजपकडे चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मंत्रिपदांबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून एकनाथ शिंदे नाराज होते. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात गृहमंत्रीपद आणि नगरविकास खात्याची मागणी केली होती. पण कोणत्याही परिस्थितीत भाजप शिंदे गटाला गृहमंत्रीपद देण्यास तयार नव्हते.साताऱ्यातील त्यांच्या गावी निघून गेले. तिथेच एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली आणि ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. एकनाथ शिंदे त्यानंतर काल सांयकाळी महायुतीची बैठक होणार होती. पण शिंदेंच्या प्रकृती अस्वस्थामुळे ही बैठकही रद्द करण्यात आली. आज मुंबईतील ज्युपिटर रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतरअखेर आज खातेवाटपाच्या चर्चांसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्या, उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन भेट घेतल्यानंतर शिंदे आणि भाजप यांच्यातील चर्चेची दारे पुन्हा उघडल्याचे सांगितले जाते.
मशीद की मंदिर? देशात धार्मिक स्थळांचा वाद जातोय विकोपाला; मोहन भागवतांच्या सूचनांचाही होईना परिणाम
गुरुवारी (5 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे. बैठकीत या उदय सामंतांनी शिंदे गटाचा प्रस्ताव फडणवीसांसमोर ठेवल्याची माहिती आहे. 23 नोव्हेंबरनंतर फडणवीस आणि शिंदे गटात झालेली ही पहिलीच बैठक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5 तारखेला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात भाजपचे 16 जण शपथ घेऊ शकतात. यात रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, विखे-पाटील, गिरीश महाजन, हे शपथ घेण्याची शक्यता आहे. याशिवाय नितेश राणे आणि गणेश नाईक यांच्याही शपथविधी होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड, उदय सामंत यांचा शपथविधी होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, एकनात शिंदे यांची तब्येत खराब झाल्यामुळे आज त्याना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप, कणकण, अशक्तपणा आणि घशात संसर्ग झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या काही चाचण्या कऱण्यात आल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
‘या’ शेअरच्या किंमतीत वर्षभरात 500 टक्क्यांहून अधिक वाढ; आता 10 भागांत स्प्लिट होणार!