Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: ‘अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही…; देवेंद्र फडणवीसांची भावनिक प्रतिक्रीया

अजित दादांबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजित दादा संघर्षशील नेतृत्त्व होतं. सर्व परिस्थिती न डगमगता पुढेजाणारे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्रासठी आजचा दिवस कठीण आहे. 

  • By anuradha sagar
Updated On: Jan 28, 2026 | 03:35 PM
Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News

Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News

Follow Us
Follow Us:

Devendra Fadnavis on Ajit Pawar Death News:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी निधन झाले आहे. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. लँडिंग दरम्यान विमान क्रॅश झाले आणि क्षणातच जमिवीवर कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचा चुराडा झाला. या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. पवार कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजकीय नेते, पवार कुटूंबीय, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वजण बारामतीला रवाना झाले आहेत. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली आहे.  दरम्यान या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

“आज सकाळी अतिशय दुखद घटना घडली.  विमान अपघतात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली. महाराष्ट्रात शोककळा पसरली. अजितदादा पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राची कानाकोपऱ्याची माहिती असलेला, राज्याच्या प्रश्नाची जाण असलेले नेते होते. अजित दादांबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजित दादा संघर्षशील नेतृत्त्व होतं. सर्व परिस्थिती न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्रासठी आजचा दिवस कठीण आहे.  अजितदादासारखे नेतृत्त्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार महत्त्वपूर्ण योगदान देत होते.  त्यांचं असं जाणे मनाला चटका लावणारे आहे.

‘विमानाने एक घिरटी घेतली अन्…’, अजित पवार यांचा विमान अपघात नेमका कसा? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला धक्कादायक

दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला. त्यांच्या कुटुंबावरही हा प्रचंड मोठा आघात आहे. एकनाथ शिंदे आणि मी बारामतीकडे निघणार आहोत. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यांनीही यावर खूप दुखं व्यक्त केलं आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील. सुप्रिया ताई आणि पार्थ पवार यांच्याशी बोलण झालं. बारामतीला पोहचल्यावर पुढचे सगळे निर्य़ण त्यांच्या संमतीने घेतले जातील.  आज राज्यभरात शासकीय सुट्टी घोषित करत आहोत. तीन दिवसांचा दुखवटा जाहीर कऱण्यात आला आहे. पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना लवकरच दिली जाईल.  अजित पवारांच जाणं हे कधीही भरून न निघणारे नुकसान झालं.  आम्ही  इतक्या जवळून सोबत काम केलं आहे. खरं तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही. पुढच्या गोष्टी  त्यांच्या कुटुंबियाशी बोलून ठरवल्या जातील. ”

अजित पवार यांचा राजकीय प्रवास

१९९५ मध्ये अजित पवार पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले. तेव्हापासून ते या मतदारसंघातून सतत आमदार म्हणून निवडून येत आहेत. १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये ते विजयी झाले आहेत. त्यांनी केवळ राजकीय जीवनात स्वतःला स्थापित केले नाही तर स्वतःचा प्रभावही निर्माण केला आहे.

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘बारामती’ कशी बनली विकासाचे मॉडेल

शरद पवार दिल्लीहून  बारामतीकडे रवाना

विमान अपघातात शरद पवार यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे काका शरद पवार दिल्लीहून बारामतीला रवाना झाले. सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासह होत्या. देशभरातील राजकारणी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने बारामतीतील लोकांना खूप दुःख झाले आहे. घटनास्थळी मोठा जमाव जमला आहे.

Web Title: Devendra fadnavis news devendra fadnaviss emotional reaction to ajit pawars death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Baramati Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.