Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hindu- Muslim Politics: महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या ‘इतकी’ प्रकरणे; फडणवीसांनी आकडेवारीच सांगितली

आता जागे होण्याची वेळ आली आहे,  हिंदू धर्माने कधीही इतर धर्माचा अपमान केला नाही. सहिष्णुता आपल्या रक्तात आहे. हिंदुद्वेषी नेत्यांना सर्वोच्च पदावर बसवण्यासाठी कोणी मतांचे संघटन करत असेल, तर हिंदुत्व जागृत करणे गरजेचे झाले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 02, 2024 | 12:48 PM
Hindu- Muslim Politics: महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या ‘इतकी’ प्रकरणे; फडणवीसांनी आकडेवारीच सांगितली
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: देशात लव्ह जिहाद आणि व्होट जिहादच्या वाढत्या घटनांबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  मोठा गौप्यस्फोट केला आहे. “गेल्या काही दिवसांत एकट्या महाराष्ट्रात लव्ह जिहादची एक लाखाहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये हिंदू मुलींना त्यांची ओळख लपवून इतर धर्माच्या लोकांकडून लग्नाचे आमिष दाखवले जात होते. एवढेच नव्हे तर त्यांनी विरोधी आघाडी महाविकास आघाडीवर निशाणा साधत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48  पैकी  14  मतदारसंघात ‘व्होट जिहाद’चा प्रभाव दिसल्याचा दावा केला.

सोमवारी कोल्हापुरात एका कार्यक्रमाला संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, एक दशकापूर्वी आपल्याला लव्ह जिहादची घटना म्हणजे एकेकाळची घटना वाटायची. यात कोणतेही षडयंत्र नाही असे आम्हाला वाटले. आता आमच्याकडे एक लाखाहून अधिक तक्रारी आल्या आहेत, ज्यात हिंदू मुलींना फसवून इतर धर्मातील पुरुषांशी लग्न केले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्राला नरेंद्र मोदी, अमित शाहांपासून धोका…; संजय राऊत असे का म्हणाले?

तसेच  वोट जिहादचा मुद्दा उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे लोकसभेच्या निकालाचा हवाला देत भाजप उमेदवाराच्या विरोधात भरघोस मतदान केल्याने मालेगाव मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाल्याचे सांगितले. “निवडणुकीच्या निकालांव्यतिरिक्त, खरी चिंतेची बाब म्हणजे काही लोकांचा वाढता आत्मविश्वास आहे ज्यांना वाटते की जर त्यांनी मोठ्या संख्येने मतदान केले तर ते अल्पसंख्याक असूनही हिंदुत्व शक्तींचा पराभव करू शकतात,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, आता जागे होण्याची वेळ आली आहे,  हिंदू धर्माने कधीही इतर धर्माचा अपमान केला नाही. सहिष्णुता आपल्या रक्तात आहे. हिंदुद्वेषी नेत्यांना सर्वोच्च पदावर बसवण्यासाठी कोणी मतांचे संघटन करत असेल, तर हिंदुत्व जागृत करणे गरजेचे झाले आहे.

हेही वाचा: IBPS लिपिक प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला, ‘या’ लिंकवर थेट पाहा तुमचा रिझल्ट

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याच्या काँग्रेसने निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आरोप असंवैधानिक असल्याचे सांगत काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी वोट जिहाद असे शब्द वापरून संविधानाच्या मूल्यांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. तसेच,  मुस्लिम त्यांना मतदान का करत नाहीत, याचे भाजपने आत्मपरीक्षण करावे, असे  सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Web Title: Devendra fadnavis told the statistics of love jihad cases in maharashtra nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 12:48 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Love Jihad

संबंधित बातम्या

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
1

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

आधी महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर हिंदू धर्माचा…, हिंदू असल्याचे भासवून चांदने महिलांना फसवले, अखेर लव्ह जिहादचा पर्दाफाश
2

आधी महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर हिंदू धर्माचा…, हिंदू असल्याचे भासवून चांदने महिलांना फसवले, अखेर लव्ह जिहादचा पर्दाफाश

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय
3

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
4

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.