मुंबई : राज्यातील सत्तातरानंतर शिवसेना व शिंदे गटासाठी कालचा पहिलाच दसरा मेळावा होता. दरम्यान, दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी तसेच यावर राजकारण होताना सर्वांनी पाहिले. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा झाला, तर बीकेसीत (BKC) शिंदे गटाचा दसरा मेळावा झाला. त्यामुळ कोणत्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होती. कोणाचे भाषण गाजले यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत. तसेच राजकीय नेत्यांकडून दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया येत आहेत, दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devednra fadnvis) यांची कालच्या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.
[read_also content=”राहुल गांधींच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद, ‘भारत जोडो यात्रेत’ सोनिया गांधींच्या सहभागामुळं कार्यकर्त्याचा वाढला उत्साह https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-bharat-jodo-yatra-big-response-also-join-sonia-gandhi-333190.html”]
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर भाजपा तसेच मनसेनं टिका केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला ‘शिमगा’ म्हणत प्रतिक्रिया देणे टाळलं आहे. कारण शिमग्याला फक्त बोंबाबोब होते. विचारांची देवाणघेवाण होत नसते. तसेच सुज्ञ माणसं शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला शिमग्याची उपमा देत शिवसेनेवर टिका केली. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मी दोन्ही भाषणं ऐकली नाहीत. कारण, मी नागपूरला धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमात होतो. पण मी शिमग्यावर कधीच प्रतिक्रिया देणार नाही. असं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अंगावर घेतलं आहे. त्यामुळं फडणवीसांच्या या टिकेला शिवसेनेकडून काय उत्तर येतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.