Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

काहीजण म्हणत होते एकही जागा निवडून येणार नाही पण आमचे ६० आमदार निवडून आले. ब्रॅंडचा बँड वाजवण्याचे काम जनता करत असते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2025 | 05:10 PM
Maharashtra Politics: 'बेस्ट'मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, 'या' नेत्यांनी सोडली साथ

Maharashtra Politics: 'बेस्ट'मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, 'या' नेत्यांनी सोडली साथ

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेविकांनी आज शिवसेनेते प्रवेश केला. कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, उबाठाच्या माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या माजी नगरसेविका शैलजा भोईर, कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी कौटुंबिक नाते प्रत्येकजण जपत होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात हे पदाधिकारी काम करतात. आज वारकरी संप्रदायाचे देखील लोक आज शिवसेनेत सहभागी झाले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आज सखाराम पाटील, गजानन मांगरुळकर, संजय गायकर, धारीवलीचे उपसरपंच रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील, गौरव ठाकूर, छाया काळे, वारकरी सांप्रदाय अध्यक्ष सुरेश ठाकरे, उपसरपंच चंद्रकांत ठाकूर, विश्वनाथ रसाळ, हेदुटणेचे सरपंच रामदास काळण, हरिश्चंद्र मांगरुळकर यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला पाठिंबा दिला. ८० जागा लढवून ६० जागा आम्ही जिंकलो. काहीजण म्हणत होते एकही जागा निवडून येणार नाही पण आमचे ६० आमदार निवडून आले. ब्रॅंडचा बँड वाजवण्याचे काम जनता करत असते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. ते जेव्हा निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि जेव्हा पराभव होते तेव्हा ईव्हीएम खराब, मात्र बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक बॅलट पेपरवर झाली होती, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.

मागील अडीच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महायुतीच्या काळात स्थगिती सरकारचे सगळे स्पीडब्रेकर काढून टाकले. त्यामुळे जनतेने महायुतीच्या पारड्यात २३२ जागांचे ऐतिहासिक बहुमत दिले, असे ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना महायुती सरकारने ४५००० कोटींची मदत केली होती, आताही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Three former corporator join eknath shinde shivsena breakthrough to uddhav thackeray maharashtra police kdmc news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
1

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
2

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
3

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
4

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.