Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime : ‘वाह रे बीड’! हवेत गोळीबार करून Video काढणाऱ्या धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचललं

हवेत गोळीबार करून व्हिडीओ काढणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून परळी पोलिसांनी आज त्याला अटक केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 26, 2024 | 08:42 PM
'वाह रे बीड'! हवेत गोळीबार करून Video काढणाऱ्या धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचललं

'वाह रे बीड'! हवेत गोळीबार करून Video काढणाऱ्या धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचललं

Follow Us
Close
Follow Us:

गुन्हेगारीच्या घटनांवरून बीड जिल्हा सध्या राज्यात चर्चेचा मुद्दा बनला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असतानाच आता दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. हवेत गोळीबार करून व्हिडीओ काढणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून परळी पोलिसांनी आज (दि.26) त्याला अटक केली आहे.

Anjali Damania : ‘हे घ्या धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड यांचे पुरावे’; दमानियांनी शेअर केले मुंडेंचे हातात पिस्तुल घेतलेले Video

धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता याच कैलास फडला परळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान न्यायालयात हजर केले असताना कैलास फडला एक दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडून परवानाधारक पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे.

ब्रेकिंग हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता . या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात… pic.twitter.com/dlOjd5xv1k — Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 24, 2024

वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली? : अंजली दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी X प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. “वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत ! आणि एक पिस्तुल धारी . दाउतपुर ता.परळी येथील सरपंच कांता फड व मुलगा कुणाल फड अवैध शस्त्र बाळगून दहशत पसरवतात ? वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली? ही तक्रार सुद्धा एसपी नवनीत कावत यांना दिली. कारवाईची अपेक्षा” असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांकडून फड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.

Explainer : हिवाळ्यातच का वाढतो हवा प्रदूषणाचा धोका?; थंड हवेशी काय आहे संबंध? वाचा सविस्तर

तसंच महाराष्ट्रातील सर्व शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा. जिथे गरज नाही असे सगळे शास्त्र परवाने रद्द करा. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे गुंडांचा नाही. इन्स्टाग्रामवर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी यातून कोणती प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणं, त्यांना सोपं असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ? ताबडतोब बीड मधील सगळ्या शस्त्र परवान्यांची चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Web Title: Dhananjay munde worker kailas phad arrest beed police after anjali damania share firing video beed crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 08:07 PM

Topics:  

  • Beed Crime
  • dhananjay munde
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Beed Crime: तीन मुली झाल्याने छळ, दुसऱ्या लग्नाचा दबाव; 24 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
1

Beed Crime: तीन मुली झाल्याने छळ, दुसऱ्या लग्नाचा दबाव; 24 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Beed Crime: आई-वडिलांच्या साध्या ओरडण्याचा मनावर घेतला धसका; 21 वर्षीय मुलाने संपवले जीवन
2

Beed Crime: आई-वडिलांच्या साध्या ओरडण्याचा मनावर घेतला धसका; 21 वर्षीय मुलाने संपवले जीवन

Beed Politics News: हुंडा प्रथा थांबवण्यासाठी कडक कधी होणार? आ. नमिता मुंदडा यांचा सरकारला सवाल
3

Beed Politics News: हुंडा प्रथा थांबवण्यासाठी कडक कधी होणार? आ. नमिता मुंदडा यांचा सरकारला सवाल

Beed Crime: पत्नीने नांदायला नकार दिल्याने संताप; जावयाने सासरच्या घराला पेट्रोल टाकून आग
4

Beed Crime: पत्नीने नांदायला नकार दिल्याने संताप; जावयाने सासरच्या घराला पेट्रोल टाकून आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.