Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv : पळसप येथे रविवारी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन!

पळसप येथे १ मार्च रोजी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे आयोजन शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान व अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 24, 2026 | 06:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

Dharashiv : तालुक्यातील पळसप येथे रविवारी (१ मार्च) ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून, साहित्यप्रेमींसाठी हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन पार पडणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.

Dharashiv News : कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी

स्वर्गीय वसंतराव काळे यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याला अभिवादन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळीला चालना देणे आणि नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

१ मार्च रोजी सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. यानंतर ग्रंथप्रदर्शन, चित्रप्रदर्शन आणि विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. घ. ना. पांचाळ यांच्या हस्ते तर चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार शिवाजी हांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे औपचारिक उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे आणि प्रा. फ. म. शहाजिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दुपारी ‘बदलते ग्रामीण जीवन’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बदलांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर कथाकथनाचा कार्यक्रम आणि सायंकाळी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यांतील साहित्यिक, कवी आणि विचारवंत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, ज्यामुळे संमेलनाला वैचारिक समृद्धी लाभणार आहे.

सायंकाळी सहा वाजता समारोप सोहळा पार पडणार असून, आमदार सतीश चव्हाण आणि आमदार प्रविण स्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, स्थानिक कलावंतांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

Dharashiv News: सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली; ६८० बचत गटांना ३३ कोटींचा मिळाला आर्थिक आधार

दरम्यान, संमेलनाच्या पूर्वसंध्येला २८ फेब्रुवारी रोजी सकाळी स्त्रीरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच रात्री हभप ईश्वरी दिदी महाराज यांचे कीर्तनही होणार आहे. या सर्व कार्यक्रमांमुळे साहित्य, समाजकार्य आणि संस्कृती यांचा सुंदर संगम या संमेलनातून अनुभवायला मिळणार आहे. या संमेलनास परिसरातील नागरिक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि लेखकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ग्रामीण साहित्य चळवळीला बळ देणारा आणि नव्या विचारांना दिशा देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Dharashiv 11th marathwada rural literature conference to be held at palasap on sunday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • Dharashiv

संबंधित बातम्या

Dharashiv News : कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी
1

Dharashiv News : कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी

Dharashiv News : धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा; प्रतिसादातील विलंबामुळे रुग्णांच्या जीवितास धोका
2

Dharashiv News : धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा; प्रतिसादातील विलंबामुळे रुग्णांच्या जीवितास धोका

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! धाराशिव तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेसंदर्भात कारवाई सुरू
3

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! धाराशिव तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेसंदर्भात कारवाई सुरू

Dharashiv News: उच्च न्यायालयाचा आदेश, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा नाही; निधी वर्ग करण्यात विलंब का होतोय ?
4

Dharashiv News: उच्च न्यायालयाचा आदेश, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा नाही; निधी वर्ग करण्यात विलंब का होतोय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.