• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dharashiv »
  • In Dharashiv District 125 Cases Involving Women And Children Were Resolved Through Sakhi Centers

Dharashiv News: सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली; ६८० बचत गटांना ३३ कोटींचा मिळाला आर्थिक आधार

धाराशिव जिल्ह्यात सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली लागले असून ६८० बचत गटांना ३३ कोटींचा आर्थिक आधार मिळाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार..

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 24, 2026 | 05:48 PM
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार होते.

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून मागील सहा महिन्यांत १२५ प्रकरणातून शेकडो पीडित महिला व बालकांना दिलासा देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील ६८० महिला बचत गटांना विविध व्यवसायांसाठी जवळपास ३३ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आल्याची माहिती सर्वसमावेशक महिला जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत देण्यात आली. सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार होते.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. महिला व बालकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवदत्त गिरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, प्रभारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी किशोर गोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Dharashiv News : कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी

१२५ प्रकरणांचा निपटारा

सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत एकूण १२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची २७, बाल लैंगिक शोषणाची ३, बालविवाहाची ८ आणि इतर ८४ प्रकरणांचा समावेश आहे. या सेंटरमार्फत १३२ जणांचे समुपदेशन करण्यात आले. ६ जणांना पोलीस मदत, २३ जणांना वैद्यकीय मदत, १२ जणांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मार्गदर्शन, ७ जणांना आश्रय/स्वाधार गृह, २ प्रकरणे संरक्षण अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली असून ८१ जणांना इतर सेवा व पुनर्वसनाचा लाभ देण्यात आला आहे.

६८० बचत गटांना ३२.८० कोटींचे कर्ज

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत ६८० महिला बचत गटांना ३२ कोटी ८० लाख ५१ हजार रुपयांचे बँक कर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्ज वसुलीचे प्रमाण ९८.७० टक्के इतके समाधानकारक आहे. या कर्जाच्या माध्यमातून महिलांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, हळद लागवड, तुती लागवड, रेशीम कोष निर्मिती, मसाले-पापड उद्योग, दाल मिल, भाजीपाला लागवड तसेच रेडीमेड गारमेंट व्यवसाय सुरू केले आहेत.

सामाजिक प्रश्नांवर कायदेशीर जनजागृती

बैठकीत अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम तसेच कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध विषयांवर चर्चा करण्यात आली. हुंडा प्रथा व कौटुंबिक हिंसाचारासारख्या सामाजिक समस्यांबाबत कायदेशीर जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

बालसंगोपनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय निरीक्षणगृह/बालगृह समिती, बालकल्याण समिती, मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण समिती, बालविवाह प्रतिबंध कृतीदल, प्रायोजकत्व व प्रतिपालकत्व मंजूर समिती, जिल्हा पुनर्वसन समिती तसेच जिल्हा परिविक्षा समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

Web Title: In dharashiv district 125 cases involving women and children were resolved through sakhi centers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • india
  • maharashtra
  • Women

संबंधित बातम्या

Dharashiv News : कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी
1

Dharashiv News : कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
2

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
3

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी

Pawan Hans Helicopter: अवघ्या काही क्षणात होत्याच नव्हत झालं! ७ जणांना घेऊन जाणारे पवन हंस हेलिकॉप्टर अंदमान समुद्रात कोसळले
4

Pawan Hans Helicopter: अवघ्या काही क्षणात होत्याच नव्हत झालं! ७ जणांना घेऊन जाणारे पवन हंस हेलिकॉप्टर अंदमान समुद्रात कोसळले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वेळेत निदान करा, कर्करोगावर मात करा! आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे राज्यातील जनतेला आवाहन

वेळेत निदान करा, कर्करोगावर मात करा! आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे राज्यातील जनतेला आवाहन

Feb 24, 2026 | 07:32 PM
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

Feb 24, 2026 | 07:30 PM
Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा

Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा

Feb 24, 2026 | 07:27 PM
IND W vs AUS W 1st ODI: पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव; फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय

IND W vs AUS W 1st ODI: पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव; फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय

Feb 24, 2026 | 07:24 PM
अखेर El Mencho चा गेम ओव्हर? प्रेयसीच्या ‘त्या’ भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड

अखेर El Mencho चा गेम ओव्हर? प्रेयसीच्या ‘त्या’ भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड

Feb 24, 2026 | 07:20 PM
Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम

Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम

Feb 24, 2026 | 07:15 PM
शासकीय योजनांची माहिती देणारे फलक आता शाळेच्या भितींवर? मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

शासकीय योजनांची माहिती देणारे फलक आता शाळेच्या भितींवर? मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

Feb 24, 2026 | 07:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.