Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा; प्रतिसादातील विलंबामुळे रुग्णांच्या जीवितास धोका

गंभीर जखमी रुग्णासाठी १०८ वर संपर्क साधण्यात आला. मात्र बेंबळी ग्रामीण रुग्णालय अवघ्या ३ किमी अंतरावर असतानाही तेथून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास सुमारे १ तास उशीर लागल्याची गंभीर बाब समोर आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 24, 2026 | 05:20 PM
धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा; प्रतिसादातील विलंबामुळे रुग्णांच्या जीवितास धोका

धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा; प्रतिसादातील विलंबामुळे रुग्णांच्या जीवितास धोका

Follow Us
Follow Us:

शीतलकुमार शिंदे । नवराष्ट्र : धाराशिव जिल्ह्यात आपत्कालीन आरोग्यसेवेसाठी कार्यरत असलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका अत्यवस्थ रुग्णांना वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्या आहेत. अपघात, हृदयविकाराचा झटका, मेंदूविकार किंवा इतर जीवघेण्या परिस्थितीत “गोल्डन अवर”मध्ये उपचार मिळणे अत्यावश्यक असताना रुग्णवाहिका तासन्तास उशिरा पोहोचत असल्याने रुग्णांच्या जीविताशी प्रत्यक्ष खेळ होत असल्याची संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

सलग दोन घटनांनी प्रश्नचिन्ह

धाराशिव ते बेंबळी मार्गे उजनी (ता. औसा, जि. लातूर) या मार्गावरील आंबेवाडी चौरस्ता येथे शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी दुचाकी व महालिंगी (ता. धाराशिव) येथील कार यांच्यात अपघात झाला. गंभीर जखमी रुग्णासाठी १०८ वर संपर्क साधण्यात आला. मात्र बेंबळी ग्रामीण रुग्णालय अवघ्या ३ किमी अंतरावर असतानाही तेथून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास सुमारे १ तास उशीर लागल्याची गंभीर बाब समोर आले आहे. या दरम्यान रुग्णाची प्रकृती बिघडत असल्याने नातेवाईकांनी खाजगी वाहनाने धाराशिव येथे रुग्णास हलविले.

नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी

देवळाली येथील अपघात

देवळाली येथे सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या अपघातातही १०८ रुग्णवाहिका वेळेत न आल्याने या अपघातातील अत्यवस्थ रुग्णाला खाजगी वाहनाने रुग्णालयात दाखल करावे लागले. सलग दोन घटनांमुळे या आपत्कालीन सेवेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

असून अडचण, नसून खोळंबा

१०८ ही रुग्णवाहिका सेवा अपघातग्रस्त व अत्यवस्थ रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र कॉल रिसिव्हिंगमध्ये विलंब रुग्णवाहिकेचे घटनास्थळी उशिरा पोहोचणे चालक व तांत्रिक कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती किंवा हलगर्जीपणा, नियंत्रण कक्षातील समन्वयाचा अभाव या कारणांमुळे सेवेचा उद्देशच फोल ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

राज्यघटनेच्या कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकाला जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालांमध्ये वेळेवर वैद्यकीय उपचार मिळणे हा जीवनाच्या हक्काचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेवर न येता विलंब होणे हे या मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे. परिणामी रुग्णवाहिका सेवेकडून सातत्याने होणाऱ्या विलंबस कारणीभूत अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

१०८ सेवा ही रुग्णवाहिका सेवा शासनाच्या कराराअंतर्गत चालवली जाते. करारातील प्रतिसाद कालावधी (रिस्पॉन्स टाइम) पाळला गेला नाही, तर संबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई, दंड आकारणी किंवा करार रद्द करण्याची तरतूद असते. या प्रमाणे कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, रुग्णवाहिका सेवांच्या मानामनिस त्रस्त नागरिकांची ओरड वाढली असून जिल्ह्यातील एकूण १०८ रुग्णवाहिकांची संख्या व त्यांची प्रत्यक्ष कार्यरत स्थिती प्रशासनाने जाहीर करावी. प्रतिसाद कालावधी (रिस्पॉन्स टाइम) सार्वजनिक करावा. जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली कार्यरत आहे का, याची माहिती द्यावी. दोषी चालक/अधिकाऱ्यांवर निलंबन व फौजदारी कारवाई करावी. स्वतंत्र चौकशी समिती नेमून अहवाल जाहीर करावा. अशीही मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे.

आपत्कालीन आरोग्यसेवा ही केवळ योजना नसून ती नागरिकांच्या जीविताशी थेट संबंधित व्यवस्था आहे. गोल्डन अवरमध्ये उपचार न मिळाल्यास जीवितहानी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका सेवेतील त्रुटी तातडीने दूर करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा विश्वास पूर्णपणे ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे.

विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

Web Title: Oversight of 108 ambulance service in dharashiv delay in response poses a risk to patients lives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Health Department
  • Hospital

संबंधित बातम्या

ग्रामीण जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवा; जिल्हा परिषद सदस्या कविता ओबळे यांचे आवाहन
1

ग्रामीण जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवा; जिल्हा परिषद सदस्या कविता ओबळे यांचे आवाहन

Maharashtra Rain Update : धाराशिवमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; ८ जूनपर्यंत अपेक्षेपेक्षा दुप्पट पावसाची नोंद
2

Maharashtra Rain Update : धाराशिवमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; ८ जूनपर्यंत अपेक्षेपेक्षा दुप्पट पावसाची नोंद

Dharavi Project: आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट; 1 लाख 25 हजार घरांसह पुनर्वसनाचा महाप्लॅन
3

Dharavi Project: आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट; 1 लाख 25 हजार घरांसह पुनर्वसनाचा महाप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.