धाराशीव येथील सरपंचावरील हत्या प्रकरणात नवीन अपडेट (फोटो- टीम नवराष्ट्र)
धाराशीव: राज्यात बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. तर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र हे प्रकरण चर्चेत असतानाच धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात देखील अशीच घटना घडली होती. तुळजापूर तालुक्यातील एका गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. आता या प्रकरणात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
तुळजापूर तालुक्यातील मेसाई गावाच्या जवळच्या एका गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मेसाई गागावच्या सरपंचाचे नाव नामदेव निकम आहे. त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. ते या हल्ल्यात थोडक्यात बचावले होते. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मध्यरात्री निकम त्यांच्या गाडीतून प्रवास करत होते. सोबत त्यांचा भाऊ देखील होता. त्यावळेस काही गुंडांनी त्यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला केला. मात्र या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: ‘बाईकवरून आले, गाडीच्या काचा फोडल्या अन् पेट्रोलचे…’; धारशिवमध्ये बीडची पुनरावृत्ती, सरपंचावर जीवघेणा हल्ला
सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेला हल्ला हा त्यांनी रचलेला बनाव होता, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले होते. बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःच हा हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे. हा हल्ला झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी बारकाईने तपास केला असता चौकशीत विसंगती आढळून आली. त्यातून हा हल्ला म्हणजे एक बनाव होता हे समोर आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
तुळजापूर तालुक्यातील मेसाई गावाच्या जवळच्या एका गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाईकवरून आलेल्या गुंडांनी दगडाच्या मदतीने त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंटर गाडीत पेट्रोलचे फुगे टाकले. अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे नामदेव निकम यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे मात्र अजून समोर आलेले नाही. मात्र हा हल्ला म्हणजे बीडची पुनरावृत्ती होती का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत आहेत. राज्यामध्ये सध्या बीड हत्या व परभणी हिंसाचार प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. राज्यातील या गुन्हेगारींच्या घटनेवर नागरिकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. वाल्मिकी कराड हा मुंडे यांच्या जवळचा व्यक्ती असल्याने मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत.