Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Din : महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न; ७०% भाजलेल्या महिलेची प्रकृती गंभीर, परिवहनमंत्री शहरात असतानाच घटना

महाराष्ट्र दिनी एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ती ७० टक्के भाजली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून, पालकमंत्री शहरात असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जातो

  • By श्वेता झगडे
Updated On: May 01, 2026 | 04:42 PM
महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न; ७०% भाजलेल्या महिलेची प्रकृती गंभीर, परिवहनमंत्री शहरात असतानाच घटना

महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न; ७०% भाजलेल्या महिलेची प्रकृती गंभीर, परिवहनमंत्री शहरात असतानाच घटना

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न
  • ७०% भाजलेल्या महिलेची प्रकृती गंभीर
  • परिवहनमंत्री शहरात असतानाच घटना
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. बीबी किशनराव पाटील या महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत त्या सुमारे ७० टक्के भाजल्या असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Maharashtra Politics: सहाही प्रभाग सभापतीपद महायुतीकडे; ठाकरे गट, काँग्रेसची माघार: भाजपचे पाच, शिंदे सेनेचा एक सभापती

मिळालेल्या माहितीनुसार, बीबी पाटील या भूविकास बँकेत कार्यरत होत्या. मात्र बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या सेवेला फटका बसला. प्रलंबित वेतन, सेवा लाभ आणि बँकिंग क्षेत्रात समावेश करून घेण्याची मागणी त्या सातत्याने प्रशासनाकडे करत होत्या. पूर्ण वेतन मिळावे किंवा पर्यायी व्यवस्था करावी, यासाठी त्यांनी अनेकदा निवेदने दिली होती. विशेष म्हणजे २० एप्रिल 2026 रोजीच त्यांनी आत्मदहनाचा इशारा देणारे निवेदन प्रशासनाला दिले होते. मात्र या इशाऱ्याकडे पोलीस व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

महाराष्ट्र दिनाच्या प्रमुख कार्यक्रमादरम्यान संतप्त अवस्थेत त्यांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी त्या गंभीररीत्या भाजल्या.

या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शहरात उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षा व्यवस्था, निवेदनांवरील कार्यवाही आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. महाराष्ट्र दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ठाण्यातही डबल डेकर बसची एंट्री! टीएमटी ताफ्यात ३०० नव्या बसेसची भर, प्रवाशांना मोठा दिलासा

Web Title: Maharashtra day self immolation attempt woman critical pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • india
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार
1

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार

Lucknow Fire News : लखनौमध्ये भीषण आग; 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, बचावासाठी नागरिकांची जीवघेणी धडपड
2

Lucknow Fire News : लखनौमध्ये भीषण आग; 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, बचावासाठी नागरिकांची जीवघेणी धडपड

‘रॉइनेट’कडून ‘बीसी सखी’ नेटवर्क बळकट; देशभरातील २४,००० हून अधिक महिला उद्योजिकांचे सक्षमीकरण 
3

‘रॉइनेट’कडून ‘बीसी सखी’ नेटवर्क बळकट; देशभरातील २४,००० हून अधिक महिला उद्योजिकांचे सक्षमीकरण 

Ashadhi Wari 2026 : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघा; आषाढी यात्रेसाठी एसटीची विशेष बससेवा सज्ज
4

Ashadhi Wari 2026 : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघा; आषाढी यात्रेसाठी एसटीची विशेष बससेवा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.