Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMAY Dharashiv News : धाराशिवमध्ये ‘पंतप्रधान आवास योजने’ला गती! 89043 कुटुंबांचे स्वप्न होणार पूर्ण, जि. प. अध्यक्षांची माहिती

PMAY Dharashiv News : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया गतिमान केली आहे. सन २०२४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या याद्या आता उपलब्ध झाल्या असून, या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १ लाख ८ हजार २३२ कुटुंबांची नोंद करण्यात आली

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 16, 2026 | 05:17 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ‘आवास’ ॲपवरून सर्वेक्षण; नाव वगळल्याच्या आरोपांना प्रशासनाचा खुलासा
  • भूमिहीन ७८४ कुटुंबे पात्र
  • घरकुलासाठी जागा आणि नोंदणीची तरतूद
  • ‘यादीत नाव नाही’ म्हणून निराश होऊ नका
  • ६७ हजार ७६० कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ
PMAY Dharashiv News:  ८९ हजार ४३ कुटुंबे पात्र, तर १९ हजार १८ आतापर्यंत ६७ हजार ७६० लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली आहे. त्या रविवारी १६ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

विशेष म्हणजे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत नाव नसले तरी पात्र कुटुंबाला नियमानुसार योजनेत समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे यादीत नाव नसल्याने लाभापासून कायमचे वंचित राहावे लागेल, अशी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘आवास’ ॲपवरून सर्वेक्षण; नाव वगळल्याच्या आरोपांना प्रशासनाचा खुलासा

प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्वेक्षण ‘आवास’ या मोबाइल ॲपच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे कोणाचे नाव मुद्दाम यादीतून वगळण्यात आले किंवा राजकीय हस्तक्षेपातून पात्र-अपात्र ठरविण्यात आले, असे आरोप तथ्यहीन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सन २०२४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची माहिती आता उपलब्ध झाल्यामुळे पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया पुढे नेण्यास वेग आला आहे. सर्वेक्षणातील निकषांनुसार पात्रता निश्चित केली जात असून, शासनाच्या नियमांनुसार लाभ देण्यात येत आहे.

Dharashiv News: १५ कृषी अधिकारी निलंबित; धाराशिवच्या निविष्ठा घोटाळ्यात मोठी कारवाई, आता गुन्हे दाखल होणार का?

भूमिहीन ७८४ कुटुंबे पात्र

जिल्ह्यातील ७८४ भूमिहीन कुटुंबे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहेत. घरकुलासाठी जागेचा प्रश्न असलेल्या भूमिहीन पात्र लाभार्थ्यांनाही योजनेच्या माध्यमातून घराचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घरकुलासाठी जागा आणि नोंदणीची तरतूद

घरकुलासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही प्रशासनाकडून कार्यवाही केली जात आहे. पात्र लाभार्थ्यांना घरकुल उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होणे महत्त्वाचे असून, त्यासाठी शासनाच्या नियमांनुसार कार्यवाही केली जात आहे. १,००० चौरस फूट क्षेत्राच्या नोंदणी दस्ताबाबतही तरतूद असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेमुळे ग्रामीण भागातील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पात्र कुटुंबांनी उपलब्ध यादी तपासून आपले नाव, पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता याबाबत संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dharashiv News: महायुतीतच तुफान राडा! तानाजी सावंत-राहुल मोटे समर्थक आमनेसामने; दगडफेकीत 12 गाड्यांची तोडफोड

‘यादीत नाव नाही’ म्हणून निराश होऊ नका

सर्वेक्षणात नाव आले नाही किंवा सध्याच्या यादीत नाव दिसत नाही, म्हणून पात्र कुटुंबांनी निराश होऊ नये. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या कुटुंबांना नियमानुसार पुढील प्रक्रियेत समाविष्ट करण्याची तरतूद आहे. त्यामुळे ग्रामपातळीवर लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे आणि पात्रतेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.

६७ हजार ७६० कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ

धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत ६७ हजार ७६० लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ८९ हजार ४३ पात्र कुटुंबांच्या तुलनेत ६७ हजार ७६० लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याने पात्र कुटुंबांपैकी मोठ्या संख्येने घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांसाठी विविध मनोरंजन व सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात येत आहेत. १ सप्टेंबर रोजी मंगळागौरी स्पर्धा, तिसऱ्या मंगळवारी ‘आग आई, अहो आई’ चित्रपटाचे तेर येथे मोफत प्रदर्शन, तसेच चौथ्या सोमवारी ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

Web Title: Pmay dharashiv news momentum for pradhan mantri awas yojana in dharashiv dreams of 89043 families to be fulfilled zilla parishad president shares details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • Housing Schemes
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
1

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत
2

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..
3

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…
4

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.