Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : सहा जीव गेले, तरी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुठे होती? येडशीतील अग्नितांडवावरून जयदत्त क्षीरसागर आक्रमक

Dharashiv News : धाराशिवच्या येडशी येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच करंडे कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देत प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Nov 12, 2026 | 06:27 PM
Yedashi fire jaydatta kshirsagar

Yedashi fire jaydatta kshirsagar

Follow Us
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : येडशीतील भीषण अग्नितांडवात एकाच करंडे कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मात्र, या दुर्घटनेने केवळ एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला नाही, तर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील त्रुटीही उघड केल्या आहेत. आग लागल्यानंतर वेळेत मदत का पोहोचली नाही? जिल्ह्यात सक्षम अग्निशमन आणि बचाव यंत्रणा का नाही? अशा परखड प्रश्नांची सरबत्ती करीत माजी मंत्री तथा अखिल भारतीय तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दिवाळीच्या आनंदावर काळाने घाला घातलेल्या येडशी येथील या दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री अडीचच्या सुमारास किराणा दुकानाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले आणि क्षणार्धात करंडे कुटुंबाचा संसार राखरांगोळी झाला.

या घटनेची माहिती मिळताच क्षीरसागर यांनी येडशी येथे भेट देऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. शोकाकुल करंडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांनी आगीची घटना, मदतकार्यात आलेल्या अडचणी आणि संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली.

Buldhana: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार करणार मदत; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचे आश्वासन

साखर कारखाने, फटाका उद्योग आहेत, मग आधुनिक अग्निशमन यंत्रणा कुठे?

धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने आणि फटाका उद्योग असताना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अत्याधुनिक अग्निशमन व बचाव यंत्रणा सक्षम का नाही, असा सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित केला. दुर्घटनेच्या वेळी तातडीने मदत पोहोचणे अपेक्षित असताना विलंब झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ दुर्घटनेनंतर सांत्वन आणि आश्वासन देण्यापेक्षा अशा घटना रोखण्यासाठी तसेच जीवितहानी टाळण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; मदतीसाठी पाठपुरावा

करंडे कुटुंबावर कोसळलेल्या या संकटाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देणार असून, पीडित कुटुंबीयांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. या दुःखाच्या प्रसंगी आपण कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बडगे, अरुण बोगाने, रवि कोरे आळणीकर यांच्यासह तेली समाजाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

सहा निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का? आपत्ती व्यवस्थापनाच्या त्रुटी दूर करून जिल्ह्यात सक्षम अग्निशमन यंत्रणा उभी राहणार का? येडशीच्या दुर्घटनेने उपस्थित केलेले हे प्रश्न आता केवळ करंडे कुटुंबापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्याच्या सुरक्षिततेशी निगडित झाले आहेत.

Shivajinagar Bus Depot: ८२५ कोटी, महामेट्रोसोबत मोठा करार; शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा होणार कायापालट

💡

Frequently Asked Questions

  • Que: येडशी अग्नितांडवात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच करंडे कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.

  • Que: येडशी अग्नितांडवावर जयदत्त क्षीरसागर यांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले. साखर कारखाने आणि फटाका उद्योग असलेल्या जिल्ह्यात आधुनिक अग्निशमन यंत्रणा का नाही, असा सवाल त्यांनी केला.

  • Que: करंडे कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न होणार आहेत?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुर्घटनेची माहिती देणार असून, पीडित कुटुंबीयांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितलं.

Web Title: Dharashiv news yedshi fire incident six dead jaydutt kshirsagar questions administration vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Dharashiv News
  • Fire Incident

संबंधित बातम्या

Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केली वडिलांची हत्या; लोखंडी पाइपने बेदम मारहाण
1

Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केली वडिलांची हत्या; लोखंडी पाइपने बेदम मारहाण

Dharashiv News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंभार गल्लीत भीषण आग! गरीब कुटुंबाचा संसार खाक; तरुणांच्या धाडसामुळे शेकडो घरे बचावली
2

Dharashiv News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंभार गल्लीत भीषण आग! गरीब कुटुंबाचा संसार खाक; तरुणांच्या धाडसामुळे शेकडो घरे बचावली

Dharashiv Fire Incident: धाराशिवमध्ये ‘महाजनको’च्या सौरप्रकल्पाला भीषण आग, १५ मेगावॉट वीजनिर्मिती ठप्प; सुरक्षा रक्षक जखमी
3

Dharashiv Fire Incident: धाराशिवमध्ये ‘महाजनको’च्या सौरप्रकल्पाला भीषण आग, १५ मेगावॉट वीजनिर्मिती ठप्प; सुरक्षा रक्षक जखमी

Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…
4

Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.