Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेंडावंदनावेळी हृदयविकाराने पीएसआय मोहन जाधव यांचे निधन, उमरगा येथे उत्पादन शुल्क विभागातील घटना

२६ जानेवारी रोजी सकाळी उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू होता.  झेंडावंदन सुरू असताना पीएसआय मोहन जाधव यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 26, 2026 | 04:39 PM
झेंडावंदनावेळी हृदयविकाराने पीएसआय मोहन जाधव यांचे निधन

झेंडावंदनावेळी हृदयविकाराने पीएसआय मोहन जाधव यांचे निधन

Follow Us
Close
Follow Us:
  • झेंडावंदनावेळी हृदयविकाराने पीएसआय मोहन जाधव यांचे निधन
  • उमरगा येथे उत्पादन शुल्क विभागातील घटना
  • खाली पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत
धाराशिव : देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात उत्साहात साजरा होत असतानाच जिल्ह्यातील उमरगा शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेले दुय्यम निरीक्षक (पीएसआय) मोहन भीमा जाधव यांचे झेंडावंदनाच्या वेळी कर्तव्य बजावत असतानाच आकस्मिक निधन झाले.

२६ जानेवारी रोजी सकाळी उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू होता. अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित असतानाच झेंडावंदन सुरू असताना पीएसआय मोहन जाधव यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. झेंडावंदनावेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या तात्काळ लक्षात आले की, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. खाली पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली.

तमाशा क्षेत्राचा पहिल्यांदाच पद्मने सन्मान! संगमनेरचे रघुवीर खेडेकर याना पद्मश्री जाहीर

मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मोहन जाधव यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेनंतर आनंदाच्या वातावरणात क्षणातच शोककळा पसरली. विशेष बाब म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच जाधव यांना पीएसआय पदावर पदोन्नती मिळाली होती. त्याआधी ते सोलापूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत होते. प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त आणि कर्तव्यदक्षतेचा आदर्श निर्माण केला होता.

सहकारी अधिकाऱ्यांच्या मते, मोहन जाधव हे अत्यंत शांत स्वभावाचे, संयमी आणि सर्वांना मदतीसाठी तत्पर असणारे अधिकारी होते. कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांसाठी ते मार्गदर्शक आणि आधारवड होते. ते कधीही आवाज न चढवता काम समजावून सांगत. प्रत्येकाशी आपुलकीने वागत. आज आम्ही केवळ अधिकारी नव्हे, तर एक चांगला माणूस गमावला आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी आशा भावना व्यक्त केल्या आहेत. कर्तव्य बजावत असतानाच, देशाच्या प्रजासत्ताक दिनीच आलेले हे निधन संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

पीएसआय मोहन भीमा जाधव यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असून, त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्तव्यनिष्ठ अधिकारी देशसेवेतच हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून, प्रजासत्ताक दिनी झालेली ही घटना कायमस्वरूपी दुःखद आठवण ठरणार आहे.

Pune ZP Election 2026: तांत्रिक बिघाड रोखण्यासाठी निवडणूक आयोगाची खबरदारी; भोसरीत जुनी यंत्रे सीलबंद

Web Title: Psi mohan jadhav dies of heart attack during flag hoisting process excise department incident in umarga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Republic Day 2026

संबंधित बातम्या

देश साजरा करतोय 77 वा प्रजासत्ताक दिन; पण राष्ट्रीय सणाच्या दिनी आत्मचिंतनाची अत्यंत गरज
1

देश साजरा करतोय 77 वा प्रजासत्ताक दिन; पण राष्ट्रीय सणाच्या दिनी आत्मचिंतनाची अत्यंत गरज

प्रजासत्ताक दिन 2026: ‘बॅटल ऑफ गलवान’पासून ‘मातृभूमी’पर्यंत, देशभक्ती जागवणारी सदाबहार गाण्यांची खास यादी
2

प्रजासत्ताक दिन 2026: ‘बॅटल ऑफ गलवान’पासून ‘मातृभूमी’पर्यंत, देशभक्ती जागवणारी सदाबहार गाण्यांची खास यादी

Simran Bala : कोण आहे २६ वर्षीय सिमरन बाला? तरुणीने पुरुष पथकाची कमान सांभाळून कर्तव्यपथावर रचला इतिहास
3

Simran Bala : कोण आहे २६ वर्षीय सिमरन बाला? तरुणीने पुरुष पथकाची कमान सांभाळून कर्तव्यपथावर रचला इतिहास

Girish Mahajan: “मुद्दामून नाव डावलण्याचा….”; डॉ. आंबेडकरांच्या नाव न घेतलेल्या गोंधळावर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण, म्हणाले..
4

Girish Mahajan: “मुद्दामून नाव डावलण्याचा….”; डॉ. आंबेडकरांच्या नाव न घेतलेल्या गोंधळावर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.