Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा”, आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

नागपूर मुक्कामी सध्या चालू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार कैलास पाटली यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 11, 2025 | 04:21 PM
आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का थांबली
  • एसआयटी चौकशीची मागणी
  • आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
धाराशिव, प्रतिनिधी : शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा ही जवळपास दोन वर्षे रेंगाळलेल्या निविदा प्रक्रियेमुळे झाली असून त्याची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे (उबाठा) धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेत केली आहे. नागपूर मुक्कामी सध्या चालू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही मागणी केली आहे. शहरातील आठवडी बाजार, सार्वजनिक उद्याने, पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पुरवण्या मागण्यांच्यावेळी आपली पुरवणी मागणी मांडताना आमदार पाटलांनी हे प्रश्न मांडले अध्यक्षस्थानी तालिकाध्यक्ष चैनसुख संचेती होते. बावीस महिन्यांपूर्वी फेब्रुवारी २०२४मध्ये नगरविकास मंत्र्यांनी शहरातील रस्त्यांसाठी १४० कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र निविदा प्रक्रिया आणि स्थगितीच्या फेऱ्यात हा निधी अडकल्याने शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. याचे दुष्परिणाम या रस्त्यावरून वावरणाऱ्या शहरातील नागरिकांना भोगावे लागत आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. नगरविकास खात्याच्या गोविंदाराज यांनी झालेल्या दोन चौकशीचे निर्णय दोन्ही वेळी वेगवेगळे दिले. एका बाजूला आपण गतिशील महाराष्ट्र आता थांबणार नाही असे म्हणत असताना एका निविदा प्रक्रियेला बावीस महिने का थांबली, कुणामुळे थांबली. याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि या कामांची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन कामांना लवकरात लवकर सुरुवात झाली पाहिजे अशी रोखठोक मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी नगरविकास मंत्री सभागृहात उपस्थित होते.

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात 

शहरातील उद्यानांसाठी व आठवडी बाजारासाठी मागच्या काळात निधी मंजूर झाला. त्याला स्थगिती दिली गेली. उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने स्थगिती उठविण्याचे सांगण्यात आले. सद्य परिस्थितीत शहरात एकही उद्यान नाही. आठवडी बाजार भरणारे धाराशिव शहर हे एकमेव जिल्ह्याचे ठिकाण आहे. असे असताना त्यास स्थगिती देण्यात आली आहे. नगरविकास मंत्र्यांनी उच्च न्यायायचा मान राखून उत्तरात ही स्थगिती उठविण्याचे सूतोवाच करावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

१५व्या वित्त अयोगातून नगरपालिकांनी मिळणारा निधी खूप कमी झाला आहे. पूर्वी धाराशिव नगरपालिकेला १५ कोटींचा वित्त आयोगाचा निधी मिळत असे. आता मात्र तीन ते चार कोटींचा निधी मिळत आहे. परिणामी घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि दिवाबत्तीचा खर्च यावर विपरीत परिणाम होऊन सर्व यंत्रणा विस्कळीत झाली आहे. यावर पूर्वीप्रमाणेच नगरपालिकेला वित्त आयोगाचा निधी मिळावा. मागील वर्षात वित्त आयोगाच्या निधीचा एकही हप्ता नगरपालिकेला मिळालेला नाही. परिणामी नगरपालिकेची आर्थिक कोंडी होऊन या कामावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. ही कामे व्यवस्थित मार्गी लागण्यासाठी निधीची तात्काळ व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

शहरातील कचरा डेपो आता शहराच्या मध्यवस्तीत आलेला आहे. शहरात कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. याचे दुष्परिणाम लोकांना भोगावे लागत आहेत. काहींना श्वसनाच्या विकारांना तोंड द्यावे लागत आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता, हा कचरा नष्ट करावा आणि कचरा डेपो शहराबाहेर हलवावा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

तेर, ढोकी, कसबे तुडवळा आणि येडशी या चार गावांना एक संयुक्त पाणीपुरवठा योजना आहे. मात्र त्याचा वीजपुरवठा खंडित केला असल्याने ही योजना सध्या बंद आहे. या योजनेसाठी जवळपास सव्वा कोटी खर्चून सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र वीज देयकाअभावी व नीट मिटरिंग प्रणालीमुळे ही योजना ठप्प झालेली आहे. ही योजना चालू करण्यासाठी हप्त्याहप्त्याने वीज देयक अदा करण्याची परवानगी द्यावी. या योजनेला विद्युत पुरवठा करावा. ज्यामुळे या चार गावातील जवळपास पन्नास हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा योजनेचा लाभ घेता येईल. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Dharashiv Crime: कला केंद्रातील नर्तिकेसाठी तरुणाने संपवले जीवन

Web Title: Sit should investigate why the tender process for road works stopped and who was responsible demands mla kailas patil in the assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • Nagpur

संबंधित बातम्या

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
1

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

“एसटी मधील ५००० चालक, वाहक वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीवर”, कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
2

“एसटी मधील ५००० चालक, वाहक वर्षानुवर्षे हंगामी वेतन श्रेणीवर”, कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार?
3

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार?

‘हापूस’ आमचोच आसा! गुजरातमुळे कोकणचा ‘राजा’ अडचणीत? सरकारची भूमिका काय?
4

‘हापूस’ आमचोच आसा! गुजरातमुळे कोकणचा ‘राजा’ अडचणीत? सरकारची भूमिका काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.