
dhule-mayor-maya-pardeshi-suicide-attempt-
महापौर माया परदेशी यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे त्यांच्यावर जलद गतीने उपचार झाल्याने, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र माया परदेशी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सर्वांनी यावर आश्चर्य व्यक्त केली असून त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली आहे.
महापौर माया परदेशी यांनी आयुष्य संपवण्याचा अगदी टोकाचा निर्णय का घेतला, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, यामागे राजकीय कारण असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, धुळ्यातील गोरक्षक संजय शर्मा याने महापौर माया परदेशी यांच्या विरोधात अपमानास्पद विधान केले होते. महापौर परदेशी यांच्याबद्दल निषेधार्य वक्तव्य केल्यानंतर महापौरांनी मानसिक धक्क्यातून टोकाचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येत आहे. शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल मात्र मानहानी सहन न झाल्याने महापौरांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर विघ्नहर्ता या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून परिसरात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.
Ans: धुळे महापालिकेच्या महापौर माया परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
Ans: माया परदेशी यांच्यावर धुळे येथील विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
Ans: या घटनेमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये राजकीय कारणांचा उल्लेख करण्यात आला असून, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.