Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्ह्यात डिजिटल जनगणनेचा शुभारंभ 1 मेपासून; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती

जनगणना नोडल अधिकारी नागेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची उपस्थिती होती. जनगणना कामासाठी जिल्ह्यात एकूण ५४५९ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक प्रगणकाला सुमारे २०० घरांची जबाबदारी देण्यात आली

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 29, 2026 | 03:47 PM
सातारा जिल्ह्यात डिजिटल जनगणनेचा शुभारंभ 1 मेपासून; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती

सातारा जिल्ह्यात डिजिटल जनगणनेचा शुभारंभ 1 मेपासून; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती

Follow Us
Follow Us:

सातारा : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार सातारा जिल्ह्यात १ मे २०२६ पासून डिजिटल जनगणना मोहिमेला प्रारंभ होणार आहे. २०२७ साली होणारी ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार असून, जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपात ही प्रक्रिया राबविली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जनगणना नोडल अधिकारी नागेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची उपस्थिती होती. जनगणना कामासाठी जिल्ह्यात एकूण ५४५९ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक प्रगणकाला सुमारे २०० घरांची जबाबदारी देण्यात आली आहे. जनगणनेचा पहिला टप्पा १ मे ते १५ मे या कालावधीत होणार असून, या दरम्यान नागरिकांना स्वयं-नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. नागरिकांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ३३ प्रश्नांची माहिती भरायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा युनिक कोड पुढील टप्प्यात प्रगणकाला देणे आवश्यक असेल. दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. स्वयं-नोंदणी केलेल्या नागरिकांनी केवळ कोड देऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

या जनगणनेत नागरिकांची वैयक्तिक माहिती, कुटुंब रचना, घराचा प्रकार, सदस्यांची संख्या तसेच घरातील उपलब्ध सुविधा यांचा तपशील गोळा करण्यात येणार आहे. ही माहिती केवळ सांख्यिकीय हेतूसाठी वापरली जाणार असून, गोपनीयतेची पूर्ण हमी देण्यात आली आहे. दरम्यान, तालुका स्तरावर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. भारतात जनगणनेची परंपरा १८७२ पासून सुरू असून यंदाची जनगणना स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी ठरणार आहे.

Web Title: Digital census in satara district to commence on may 1st district collector santosh patil informs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Digital Census
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
1

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
2

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
3

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
4

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.