Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disaster News : फळणे वस्ती लगत तापोळा रस्ता खचला १०५ हून अधिक गावांचा संपर्क तुटला

यंदाच्या पावसाळ्यात महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 28, 2026 | 09:04 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

(tapola road to tapola road2)
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील फळणे वस्ती लगत तापोळा मुख्य रस्ता मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचल्याने तापोळा खोऱ्यातील १०५ हून अधिक दुर्गम व अतिदुर्गम गावांचा महाबळेश्वरशी संपर्क तुटला आहे. रस्ता खचल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून, तहसीलदार सचिन मस्के, नगराध्यक्ष सुनील शिंदे तसेच नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

यंदा जून महिन्याचा पहिला पंधरवडा कोरडा गेला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने रौद्ररूप धारण केले. १ जून ते ९ जुलै या कालावधीत केवळ ४७०.२८ मिमी (१८.५२ इंच) पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांत ५० इंच, तर पुढील आठवड्यात तब्बल ९५ इंच पावसाची भर पडली. त्यानंतरही दररोज सरासरी ३ ते ४ इंच पाऊस कोसळत असून, महाबळेश्वरने यंदा १५० इंचांच्या पर्जन्यमानाचा टप्पा गाठला आहे.

USA vs Iran : अमेरिकेशी कधीच समझोता नाही, होर्मूझ आमची ताकद; इराणचा स्पष्ट संदेश
पर्यायी रस्ता काढण्याचे प्रयत्न
फळणे वस्ती येथील रस्ता पूर्णपणे खचल्याने प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उभारण्याचे काम सुरू केले आहे. खचलेल्या रस्त्यालगत असलेल्या भुईमिया बंगल्याच्या परिसरातून लहान वाहनांसाठी तात्पुरता मार्ग तयार करता येईल का, याची पाहणी करण्यात आली. तसेच कारवी आळा–फळणे वस्ती मार्ग वाहतुकीसाठी खुला करता येईल का, याबाबतही प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे.
यावेळी तहसीलदार सचिन मस्के, नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांचा संपर्क लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
याचबरोबर ग्लेन ओगल धरणावरील तापोळा रस्त्यावरील एकमेव पूल धोकादायक स्थितीत पोहोचला असून, दरवर्षी रस्ता खचणे आणि पुलाची दुरवस्था यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, केळघर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळल्याने सातारा-मेढा मार्गे महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक तब्बल १५ तास ठप्प झाली होती. प्रशासनाने रस्ता हलक्या वाहनांसाठी खुला केला असला, तरी मोठ्या वाहनांसाठी हा मार्ग अद्याप बंद आहे.

Economy : 2027 मध्ये ब्राझीलमध्ये मंदीचा धोका नाही; अर्थमंत्री डारिओ डुरिगन यांचा विश्वास
चौकट कचरा पाचगणी डेपोमध्ये हलविण्याचा निर्णय
महाबळेश्वर शहराचा घनकचरा डेपो तापोळा रस्त्यालगत असल्याने रस्ता खचल्यामुळे शहरातील दैनंदिन कचरा डेपोपर्यंत पोहोचविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस महाबळेश्वर शहरातील कचरा पाचगणी येथील डेपोमध्ये टाकण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक संजय जंगम यांनी दिली. रस्ता सुरळीत झाल्यानंतर पूर्ववत तापोळा डेपोमध्ये कचरा नेण्याची व्यवस्था सुरू केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Disaster news the tapola road near phalne vasti has caved in cutting off access to more than 105 villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • Collapse
  • Landslide News
  • Mahabaleshwar

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

Jaykumar Gore: महाबळेश्वरच्या कार्यशाळेत मंत्री जयकुमार गोरे आक्रमक; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
2

Jaykumar Gore: महाबळेश्वरच्या कार्यशाळेत मंत्री जयकुमार गोरे आक्रमक; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.