Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आनंदाचा शिधा’ वितरणाला आजपासून ऑफलाईन पद्धतीने सुरुवात

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 23, 2022 | 11:53 AM
‘आनंदाचा शिधा’ वितरणाला आजपासून ऑफलाईन पद्धतीने सुरुवात
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सर्वसामान्यांची दिवाळी ही गोड व्हावी याकरता राज्यसरकारच्या वतीने यंदा देण्यात येणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ च्या वितरणाला आजपासून ऑफलाईन पध्दतीने सुरुवात होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना याचा लाभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑफलाईन शिधा देण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे आता फराळासाठी लागणारे चार वस्तू माफक दारात लोकांना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.

दिवाळीचा शिधा ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच पॉझ मशीनच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही व्यवस्था इंटरनेटच्या माध्यमातून सुरु होती. परंतु इंटरनेटच्या माध्यमातून सुरु असलेली ही व्यवस्था थोड्या संथगतीने सुरु असल्यामुळे आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वाटप आता ऑफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यानुसार अन्न,नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत रेशनिंग नियंत्रक, मुंबई आणि सगळ्या DCS यांच्यासोबत तातडीची बैठक झाली. या माध्यमातून सर्वसामान्यांना १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ आणि १ लिटर पामतेल या चार वस्तू देण्यात येणार आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने शिधा जिन्नस उपलब्ध करणे ही प्राधान्याची बाब असल्याने लवकरात लवकर जास्तीत जास्त पात्र शिधापत्रिकाधारकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचविण्याच्या सचूना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच सर्व लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या रेशनिंग दुकानात जाऊन घ्यावा असे आवाहनही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आले.

विभागाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ऑनलाईन सुविधा सुरळीत सुरु आहे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने वाटप करावे. तसेच ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीमुळे वेळ लागत आहे असे निदर्शनास येते तेथे आजपासून आनंदाची शिधा ही दिवाळी भेट ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे.

ऑफलाईन पध्दतीने केलेल्या शिधा जिन्नस वाटपाची माहिती सेल रजिस्टरमध्ये प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने नोंदवायची आहे. तसेच नोंद घेतांना लाभधारकाचे नाव, शिधापत्रिकेचे शेवटचे चार अंक, मोबाईल क्रमांक, दिलेल्या शिधा जीन्नासचा तपशील, प्राप्त रक्कम (१०० रुपये) आणि लाभधाराकाची सही ह्या बाबी नमूद करावयाच्या आहेत. काही जिल्ह्यात सगळे शिधाजिन्नस पुरवठाधारकाकडून उपलब्ध झाले नसल्याचे निदर्शनास आले. मात्र काही जिन्नस लाभधारकाला दुकानात उपलब्ध आहे असे दिसून आल्यावर जे उपलब्ध जिन्नस आहेत ते देण्यात यावे अशी मागणी होत आहे. या परिस्थितीत उपलब्ध जिन्नस लाभधारकाला देता येणार आहे. मात्र पुरवठादाराकडून सगळेच जिन्नस त्वरेने प्राप्त करवून घ्यावे अशा सूचनाही मंत्री चव्हाण यांनी दिल्या आहेत.

ऑफलाईन पद्धतीचा वापर होत असल्याने लाभधारकास त्याचे जोडुन दिलेल्या दुकानातूनच शिधा जिन्नस वितरित करणे गरजेचे आहे. जिन्नस वाटप हा दुकानदाराकडून त्याच्या नेहमीच्या ओळख असणाऱ्या शिधाधारकाला होणार आहे. त्यामुळे लाभधारकाकडून मिळणारी रु. १०० ही सवलत रक्कम प्रथम टप्प्यात जमा करवून घ्यावी कि संपूर्ण जिन्नस दिल्यावर, याबाबत दुकानस्तरावर निर्णय घेण्यात येईल. या वितरणाचा लेखाजोखा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. तसेच उर्वरित जिन्नस प्राप्त झाल्यावर त्याची लाभधारकाकडून पोच घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल या अटीवर उपलब्ध जिन्नस वितरीत करता येतील.

ऑफलाईन पद्धत केवळ दिवाळी भेट शिधाजिन्नस वाटपासाठी लागू आहे. NFSA आणि PMGKAY योजनेसाठी ऑनलाईने पद्धतच वापरण्यात यावी.तसेच दिवाळी भेट वाटपासाठी ऑफलाईन पद्धत अस्तित्वात असली तरी गोदामात येणारी जिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे जिन्नस यांची नोंद ऑनलाईन पद्धतीनेच ठेवणे आवश्यक आहे. त्याबाबत दक्षता घेण्याच्या व कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

Web Title: Distribution of ananda cha shidha will start from today in offline mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2022 | 11:53 AM

Topics:  

  • Diwali
  • Eknath Shinde
  • sweets

संबंधित बातम्या

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
1

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
2

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
3

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.