Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajyasabha Election 2026: शरद पवारांना कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गट टाकणार डाव; राज्यसभेसाठी हायव्होल्टेज ड्रामा

पूर्ण निवडणूक समीकरण आता शरद पवारांभोवती फिरत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 05, 2026 | 03:21 PM
Maharashtra Political Crisis 2026, Jayant Patil Vinod Tawde Meeting, Sharad Pawar

Maharashtra Political Crisis 2026, Jayant Patil Vinod Tawde Meeting, Sharad Pawar

Follow Us
Follow Us:
  • शरद पवारांच्या विरोधात रोहित टिळकांना उमेदवारी
  • सोलापूरच्या ज्योती वाघमारेही रिंगणात
  • महायुती ६ जागांवर दावा करत असताना ७ व्या जागेसाठी पवारांना रोखण्याची योजना
 

Rajyasabha Election 2026:  राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सात जागांसह १० राज्यांमध्ये एकूण ३० जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण शरद पवार यांच्या विरोधात यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने रोहित टिळक यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाची राज्यसभेची निवडणूकदेखील चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, संपूर्ण निवडणूक समीकरण आता शरद पवारांभोवती फिरत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी शरद पवारांकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुती आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेने या निवडणुकीत शरद पवार यांची कोंडी करण्याची योजना आखल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाला दुसरी जागा जिंकायची असेल तर त्यांना अतिरिक्त मतांची गरज आहे. त्यामुळे सातव्या जागेसाठी चुरस वाढणार आहे. शरद पवार यांच्याविरोधात रोहित टिळक यांना उमेदवारी देऊन शिंदे गटाने पहिला मोठा डाव टाकला आहे.

Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा

तर शिंदे गटाकडून आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता आहे. यात रोहित टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सोलापूरमधील शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योति वाघमारे यांनादेखील उमेदवारी अर्ज भरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शरद पवारांविरुद्ध (Sharad Pawar) थेट राजकीय आव्हान उभे करण्यासाठी ही रणनीती आखली जात आहे असे मानले जाते. त्यामुळे राज्यसभेतील राजकीय समीकरणेदेखील बदलण्याची शक्यता आहे.

भाजपकडून चार उमेदवारांची घोषणा

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये माजी मंत्री विनोद तावडे, आरपीआय (आठवले गट) प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हिंगोली भाजप नेते रामराव वडकुते आणि नागपूर भाजप नेत्या माया इवनाते यांचा समावेश आहे.

Yashomati Thakur : “AI च्या बाता करणाऱ्या सरकारला…”, मेळघाटातील समस्यांवरून यशोमती ठाकूर

महाविकास आघाडी (MVA) कडून शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आहे. पण ठाकरे गटाने अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही, ज्यामुळे सस्पेंस निर्माण झाला आहे. राज्यसभा निवडणुकीत, कोणत्याही उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान ३७ पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता असते. सध्याच्या संख्याबळाच्या आधारे, महायुतीला सुमारे २३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते.

शिंदे गटाकडे अंदाजे २० अतिरिक्त मते आहेत, तर अजित पवार गटाकडे तीन मते असल्याचे मानले जाते. परिणामी, राजकीय पक्ष आपापल्या मतांची गणिते आखण्यात व्यस्त आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्यसभेची निवडणूक खूपच रोमांचक होणार आहे. शरद पवार या राजकीय आव्हानाला कसे तोंड देतात हे पाहणे विशेषतः मनोरंजक असेल.

 

Web Title: Shinde group nominates a big leader to catch sharad pawar in a dilemma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mahayuti Politics
  • Rajya Sabha Election

संबंधित बातम्या

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
1

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.