DJ banned in Ganapati miravnuk in Ganeshotsav 2025 Vadgaon Maval News
वडगाव मावळ : लवकरच गणेशोत्सव सुरु आहे. यामुळे वडगाव मावळमध्ये अतिशय स्त्युत्य निर्णय घेण्यात आली आहे. वडगाव मावळमध्ये डीजेवर बंदी लावण्यात आली आहे. गणेशोत्सव साजरा करतांना ध्वनी मर्यादा आणि शासन नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. यामुळे डीजेचा वापर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करता येणार नाही. कोणीही डिजे लावून नियमभंग केला, तर कायदेशीर कारवाई केली जाईल,’’ असा इशारा वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिला आहे.
आगामी गणेशोत्सव, नियमावली, कायदा व सुव्यवस्था यासह सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या व पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी (ता.२३ ) वडगाव मावळ पोलीस ठाण्यात बैठक पार पडली. यावेळी पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त भास्कर म्हाळस्कर, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव, सुनिता कुडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, मंगेश ढोरे, भाजपाचे शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर, नारायण ढोरे, विशाल वहिले, अतुल राऊत, उमेश ढोरे, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुदेश गिरमे, ज्ञानेश्वर वाघमारे, संजय दंडेल, महादेव वाघमारे. सोमनाथ धोंगडे तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पोलीस निरीक्षक कदम म्हणाले उत्सव काळात समाजविघातक शक्तींकडून घातपात घडवण्याच्या शक्यता असतात. याकरता सर्व गणेश मंडळांनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा. मंडळाच्या ठिकाणी मद्य प्राशन करणे, जुगार खेळणे असे प्रकार आढळल्यास मंडळाचे अध्यक्षासह पूर्ण कमिटीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. डीजेला बंदी घालण्याच्या निर्णयानुसार गावातील सर्व मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेमध्ये व आदर्शवत पार पडावा असे आवाहन भास्कर म्हाळस्कर यांनी केले.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
लोणावळ्यामध्ये दुकानांवर दरोडा
पर्यटनाची पंढरी समजलं जाणाऱ्या मावळ तालुक्यातला गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली गुन्हेगारी पाहता, हत्या, दहशत, अपघात, महिलांवरील अत्याचार, जबरी चोरी आणि दरोड्याच्या घटनांनी मावळ हादरुन जात आहे. पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई देखील करण्यात येते. मात्र, पोलिसांच्या कारवाईवर समाधान होत नसल्याचे दिसून येते. कारण,मावळमधील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसून येत नाहीत. त्यातच,जुना मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यातील चिक्की दुकानाला रविवारी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी बंदूक टाकून लुटण्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी विकेंड असलेल्या दुकानदाराने पहाटेच दुकान उघडले होते त्यावेळी ग्राहक असल्याचे भाषण दोन तरुण दुकानात आले आणि कॅडबरी चॉकलेट मागितली दुकानात फारशी वर्धळ नसल्याचे पाहून त्यांनी अचानक दुकानदाराला मारहाण केली आणि बंदुकीचा धाक दाखवत गल्ल्यातील पैसे लुटून पसर झाले.