Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेतनासाठी गाढव मोर्चा! अ‍ॅड. राजू भोसले यांचा म्हसवड नगरपरिषदेला इशारा

म्हसवड नगरपालिका (mhaswad-morcha)सफाई कामगारांचा तीन वर्षाचा पीएफ व बीव्हीजी कंपनीकडून (BVG Company)एक महिन्याचा पगार नगरपालिका मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊनही गरीब कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत ते   तात्काळ द्यावेत,  या मागणीसाठी सोमवारी ( दि.१७ ) सिद्धनाथ मंदिरापासून नगरपालिके पर्यंत गाढव मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक सचिव अ‍ॅड. राजू भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

  • By Aparna
Updated On: Oct 13, 2022 | 04:09 PM
वेतनासाठी गाढव मोर्चा! अ‍ॅड. राजू भोसले यांचा म्हसवड नगरपरिषदेला इशारा
Follow Us
Close
Follow Us:

म्हसवड : म्हसवड नगरपालिका (mhaswad-morcha)सफाई कामगारांचा तीन वर्षाचा पीएफ व बीव्हीजी कंपनीकडून (BVG Company)एक महिन्याचा पगार नगरपालिका मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊनही गरीब कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत ते   तात्काळ द्यावेत,  या मागणीसाठी सोमवारी ( दि.१७ ) सिद्धनाथ मंदिरापासून नगरपालिके पर्यंत गाढव मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक सचिव अ‍ॅड. राजू भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

अ‍ॅड. राजू भोसले यांच्या नेतृत्वाखाली  ५०  सफाई कामगारांच्या सह्यांचे निवेदन  म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना देण्यात आले. यावेळी अनिल सरतापे, योगेश आवळे, अमर लोखंडे, रघुनाथ लोखंडे, सागर लोखंडे, मारुती लोखंडे,रोहित लोखंडे हे प्रमुख कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

म्हसवड नगरपालिका सफाई कामगारांचा तीन वर्षाचा पीएफ व एक महिन्याचा बीव्हीजी  कंपनीचा पगार नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे दिला जात नाही. तो तात्काळ द्यावा यामागणीसाठी  दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक सचिव अ‍ॅड. राजू भोसले यांच्या नेतृत्वाखाली सफाई कर्मचाऱ्यांनी सिद्धनाथ मंदिरापासून नगरपालिकेपर्यंत थाळी मोर्चा काढून व आमरण उपोषण   केले होते. यावेळी मुख्याधिकारी यांनी तीन वर्षाचा पीएफ व एक महिन्याचा  पगार देण्याचे लेखी पत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत  दिले होते.

-लेखी आश्वासनंतरही वेतन देण्यास दुर्लक्ष
यानंतर मुख्याधिकारी यांनी पैसे देण्याचे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना पुन्हा कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत पैसे जमा करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. दिवाळी तोंडावर आली असताना सुद्धा गरीब हातावरील पोट असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आद्याप पैसे दिले जात नाहीत.

अ‍ॅड. राजू भोसले म्हणाले,  कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा तीन वर्षाचा पीएफ  व  एक महिन्याचा पगार तात्काळ म्हसवड नगरपालिका मुख्याधिकारी यांनी द्यावा. मुख्याधिकारी यांनी बीव्हीजीला  कंपनीला वर्क ऑर्डर दिली. पण  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळेत प्रशासकीय मान्यता घेतली नाही. परंतु,  मुख्याधिकारी आणि बीव्हीजी कंपनीने दलित मागासवर्गीय गरीब सफाई कामगारांकडून कोरोना काळ असतानासुद्धा सफाईचे काम करून घेतले.   प्रशासकीय मान्यता वेळेत न घेता वर्क ऑर्डर देणाऱ्या मुख्याधिकाऱ्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करावी.

दरम्यान, अनिल सरतापे, योगेश आवळे, अमर लोखंडे, रघुनाथ लोखंडे, मारुती लोखंडे, सागर लोखंडे, रोहित लोखंडे यांनी सर्व कर्मचारी व कार्यकर्त्यांनी सदर आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Donkey march for wages adv raju bhosales warning to mhaswad municipal council nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2022 | 04:09 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mhaswad
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

छोट्या प्रकल्पांसाठी MoFA, मोठ्या प्रकल्पांसाठी महारेरा; महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेटचे स्पष्ट केले चित्र
1

छोट्या प्रकल्पांसाठी MoFA, मोठ्या प्रकल्पांसाठी महारेरा; महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेटचे स्पष्ट केले चित्र

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
2

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
3

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video
4

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.