'मुंबईत जाळपोळ किंवा दगडफेक करू नका'; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण-आंदोलन केले जात आहे. त्यानंतर आजही हे आंदोलन होत आहे. मुंबईत याचे नियोजन करण्यात आले आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी उपोषणास परवानगी दिल्याबद्दल कौतुक केले. ‘मुंबईत राज्यभरातून आलेल्या आंदोलकांना शांततेचे आवाहन करत दगडफेक किंवा जाळपोळ करू नये’, असे म्हटले आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईत मोठी गर्दी झाली असून, याचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान मनोज जरांगे यांनी म्हटले की, ‘उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी उपोषणास परवानगी दिल्याबद्दल कौतुक केले. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. याचबरोबर जरांगे पाटील यांनी मुंबईत राज्यभरातून आलेल्या आंदोलकांना शांततेचे आवाहन करत दगडफेक किंवा जाळपोळ करू नये’, असे म्हटले आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषण करणार आहेत. यासाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार सना मलिक यांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या, ‘अतिथी देवो भवः ही माझी भूमिका आहे. ते माझ्या मतदारसंघात येत आहेत, त्यामुळे मी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे’.
जरांगेंना केवळ एकाच दिवसासाठी आंदोलनाची परवानगी
मराठा समाजाचे लोक मुंबईत आले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मात्र, पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना केवळ एकाच दिवसासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे.