ajit pawar
यवत : दौंड बाजार समिती निवडणुकीत (Daund Market Committee Election) माघार घेतलेल्या उमेदवारांनी काम न केल्यानेच जागा कमी लागल्या, ही बाब लक्षात आली आहे. तरीही जे निवडून आलेत, त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता राष्ट्रवादीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दौंड येथील कार्यक्रमात बोलताना केले.
दौंड साखर कारखाना येथे दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आलेल्या 9 संचालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत माघार घेतलेल्या उमेदवारांनी पक्षाने दिलेल्या उमेदवारांचे काम न केल्याने जागा कमी लागल्या. हे स्पष्टपणे पुढे आले आहे. माघार घेतलेल्या ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केले नाही, नावाची यादी मला पाठवावी, त्यांना राष्ट्रवादी पक्षात एकनिष्ठ राहण्याबाबत मी निश्चित मार्गदर्शन करेल, असे पवार म्हणाले.
वैशाली नागवडे यांनी दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती सचालक मंडळ निवडणुकीत झालेल्या चुका यांच्या निर्दशनास आणून दिल्यावर यावर अजित पवार बोलत होते. यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक बाबा जगदाळे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष आप्पासाहेब पवार, राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, वंदना मोहिते, सर्व नवनिर्वाचित संचालक, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.