Lalit Patil escape
मुंबई : पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पाच जणांना अटक झाली असली तर ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) फरार होता. पण आता जवळपास दोन आठवड्यानंतर ललित पाटील याला चेन्नईतून अटक करण्यात आली. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी (Mumbai Sakinaka Police) ही कारवाई केली.
ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेला होता. तेव्हापासून पोलिसांसमोर त्याला पकडण्याचे आव्हान होते. ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ललित पाटीलला शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली होती. पण त्यासंदर्भात कोणतीही माहिती मिळत नव्हती. मात्र, ललित पाटीलला एक चूक केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात आला.
एक फोन केला अन्…
साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटील याने नव्या नंबरवरून फोन केला आणि तिथेच तो फसला. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी प्रचंड गोपनीयता बाळगत तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत असे. त्यावरून पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती. अखेर त्याचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली.