Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापौर, उपमहापौर पदांसाठी आज सभा; जितेंद्र डुडी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती

पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठीची विशेष सर्वसाधारण सभा सोमवार (आज) महानगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 09, 2026 | 11:55 AM
महापौर, उपमहापौर पदांसाठी आज सभा; जितेंद्र डुडी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती

महापौर, उपमहापौर पदांसाठी आज सभा; जितेंद्र डुडी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती

Follow Us
Follow Us:
  • महापौर, उपमहापौर पदांसाठी आज सभा
  • निवडीसाठी मतदानाची शक्यता; लढत होणार चुरशीची
  • जितेंद्र डुडी निवडणूक निर्णय अधिकारी
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठीची विशेष सर्वसाधारण सभा सोमवार (आज) महानगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सभेत महापौर व उपमहापौर निवडणूक, स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती तसेच विविध १३ समित्यांवरील सदस्यांची निवड हे महत्त्वाचे विषय नियोजित आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाच्या पार्श्वभूमीवर केवळ महापौर व उपमहापौर निवड करून सभा तहकूब करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे स्थायी समिती व इतर समित्यांवरील सदस्यांची निवड पुढील सभेत होण्याची दाट शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकीत १६५ पैकी ११९ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

 

महापौरपदासाठी भाजपने मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी शीतल सावंत, उपमहापौरपदासाठी दत्ता बहिरट, तर काँग्रेसकडून महापौरपदासाठी अश्विनी डॅनियल लांडगे आणि उपमहापौरपदासाठी साहिल केदारी यांनी अर्ज दाखल केले आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्ह्याचा ‘कौल’ कुणाला? ७३ जिल्हा परिषद जागांसाठी मतमोजणी, बारामतीकडे सर्वांचे लक्ष

निवडीसाठी मतदानाची शक्यता; लढत होणार चुरशीची

सुरुवातीला मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी बिनविरोध निवड होईल, असे मानले जात होते. मात्र विरोधी पक्षांनी उमेदवारी दिल्याने आता निवडणूक चुरशीची होणार असून, मतदानाची शक्यता निर्माण झाली आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत तसेच सभेदरम्यानही उमेदवारी मागे घेण्याची संधी असल्याने अंतिम क्षणापर्यंत चित्र बदलू शकते. तरीही भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने नागपुरे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

पुण्यात शिवसेना, मनसेला मोठा धक्का

शिंदेंच्या शिवसेनेसह, मनसेला पुणे महापालिकेत एकही जागा जिंकता आली नाही. भाजपसोबत युती करून शिवसेना एकत्र लढणार होती. मात्र, जागा वाटपावरून भाजपने अखेरपर्यंत दोन्ही पक्षांचं जमलं नाही. युती होईल, इच्छेप्रमाणे जागा मिळतील या भ्रमात अखेरपर्यंत पक्षाचे स्थानिक नेते चर्चा करत राहिले, मात्र शेवटच्या दिवशी स्वबळाचा नारा दिला. शिवसेनेने ११९ जागांवर उमेदवार उभे केले. मात्र व्यवस्थित नियोजन आणि सभा यांच्या अभावामुळे पक्षाच्या पदरी निराशा आल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे, महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मुलगा प्रणव धंगेकर, माजी उपमहापौर आबा बागूल यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं.

Web Title: A special general meeting will be held today for the posts of mayor and deputy mayor in pune municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
3

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
4

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.