Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्थायी, इतर समित्यांच्या निवडणुका ‘या’ दिवशी होणार; गणेश बिडकर यांनी दिली माहिती

स्थायी समिती तसेच इतर समितांच्या निवडणुका शुक्रवारी (दि. १३) रोजी होणार असल्याची माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 09, 2026 | 01:16 PM
स्थायी, इतर समित्यांच्या निवडणुका 'या' दिवशी होणार; गणेश बिडकर यांनी दिली माहिती

स्थायी, इतर समित्यांच्या निवडणुका 'या' दिवशी होणार; गणेश बिडकर यांनी दिली माहिती

Follow Us
Follow Us:
  • स्थायी, इतर समित्यांच्या निवडणुका शुक्रवारी होणार
  • गणेश बिडकर यांनी दिली माहिती
  • निवडणुकीनंतर जल्लोष न करण्याचा निर्णय
पुणे : आज महापौर पदाची निवडणूक पुणे महानगरपालिकेमध्ये पार पडत आहे. स्थायी समिती तसेच इतर समितांच्या निवडणुका शुक्रवारी (दि. १३) रोजी होणार असल्याची माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीच्या महापौर पदाच्या उमेदवार मंजुषा नागपुरे, शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

 

दहा दिवसांपूर्वी अजित दादा पवार आणि मागील महिन्यामध्ये सुरेश कलमाडी यांचे निधन झाले. पुणे शहराच्या जडणघडणीमध्ये या दोन्ही नेत्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यामुळे अभिनंदन प्रस्तावाचा वेळ कमी करून हा वेळ या दिवंगत नेत्यांविषयी सभागृहातील विविध नेत्यांना भावना व्यक्त करण्यासाठी देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडे करण्यात येणार आहे. या दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निवडणुकीसाठी लागणारा चार तास वेळ कमी करून तो या नेत्यांप्रती समर्पित करावा. तसेच महापौर पदाच्या निवडणुकीनंतर कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला, असे बिडकर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : साताऱ्याच्या ‘मिनी मंत्रालय’वर कुणाची सत्ता? भाजपची लाट रोखणार का राष्ट्रवादी?

व्हीप बजावण्यात आला

महापौर पदाच्या निवडणुकीआधी हॉटेल पॉलिटिक्स होणार का, असा प्रश्न विचारल्यावर बिडकर यांनी याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी सर्व नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला आहे, अशी माहिती गणेश बिडकर यांनी दिली.

महापौर, उपमहापौर पदांसाठी आज सभा

पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठीची विशेष सर्वसाधारण सभा सोमवार (आज) महानगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीत १६५ पैकी ११९ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महापौरपदासाठी भाजपने मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी शीतल सावंत, उपमहापौरपदासाठी दत्ता बहिरट, तर काँग्रेसकडून महापौरपदासाठी अश्विनी डॅनियल लांडगे आणि उपमहापौरपदासाठी साहिल केदारी यांनी अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: Ganesh bidkar has given detailed information about the committee elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
2

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
3

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
4

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.