Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी बसमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा राडा; चालकासह वाहकालाही मारहाण

19 मार्च रोजी सायंकाळी चारच्या सुमारास एसटी बस (एमएच २० बीएल २४३७) तिवरे गावाकडे जात असताना हा प्रकार घडला. बसमधील प्रवासी प्रकाश बाबा कोकरे (वय ३१, रा. नांदिवसे) हा दारूच्या नशेत प्रवास करत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 21, 2026 | 01:18 PM
चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा राडा

चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा राडा

Follow Us
Follow Us:

चिपळूण : चिपळूण-तिवरे या एसटी बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने बस चालक आणि वाहकासोबत हुज्जत घालत त्यांना मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना कळकवणे फाट्याजवळ घडली आहे. या प्रवाशाने केवळ शिवीगाळच केली नाही, तर चालकाच्या शर्टाचा खिसा फाडून त्याला जखमी केले. झटापटीत वाहकाचे पैसेही गहाळ झाले आहेत. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात संबंधित प्रवाशाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19 मार्च रोजी सायंकाळी चारच्या सुमारास एसटी बस (एमएच २० बीएल २४३७) तिवरे गावाकडे जात असताना हा प्रकार घडला. बसमधील प्रवासी प्रकाश बाबा कोकरे (वय ३१, रा. नांदिवसे) हा दारूच्या नशेत प्रवास करत होता. त्याचे तिकीट कळकवणे फाट्यापर्यंतच असल्याने वाहक पाराजी सरवदे यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. याचा राग येऊन प्रकाश कोकरे याने वाहक आणि चालक उमेश सुखदेव हजारे (वय ३६) यांच्याशी विनाकारण वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

हेदेखील वाचा : Ashok Kharat Case update: ‘म्हणून जास्त उडायचं नसतं!…; रोहिणी खडसेंनी चाकणकरांच्या जखमेवर मीठ चोळलं

दरम्यान, प्रकाश कोकरे याने चालकाला हाताने मारहाण केली. यात चालकाच्या चेहऱ्यावर नखे लागून दुखापत झाली. या झटापटीत चालकाच्या शर्टाचा खिसा फाटला. वाहकासोबत झालेल्या धक्काबुक्कीत त्यांच्या खिशातील ८०० रुपये गहाळ झाले आहेत. शासकीय कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी चालक उमेश हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकाश कोकरे विरुद्ध गुन्हा दाखल केला.

डिझेल खरेदीतून दरवर्षी सुमारे 241 कोटी रुपयांची बचत

दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया कोणताही हस्तक्षेप सहन न करता पारदर्शक पद्धतीने राबविल्यामुळे केवळ डिझेल खरेदीतून दरवर्षी सुमारे 241 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Drunken passenger misbehave in st bus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • st bus

संबंधित बातम्या

पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट; आर्थिक मदत न मिळाल्यास लालपरीची चाके थांबणार?
1

पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट; आर्थिक मदत न मिळाल्यास लालपरीची चाके थांबणार?

Ashadhi Wari 2026 : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघा; आषाढी यात्रेसाठी एसटीची विशेष बससेवा सज्ज
2

Ashadhi Wari 2026 : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघा; आषाढी यात्रेसाठी एसटीची विशेष बससेवा सज्ज

ST Employees : एसटीच्या आर्थिक संकटात ८६ हजार कर्मचाऱ्यांची देणी रखडली; परिवहन मंत्र्यांकडे निवेदन
3

ST Employees : एसटीच्या आर्थिक संकटात ८६ हजार कर्मचाऱ्यांची देणी रखडली; परिवहन मंत्र्यांकडे निवेदन

ST Bus Fire : नीरा-बारामती मार्गावर एसटी बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
4

ST Bus Fire : नीरा-बारामती मार्गावर एसटी बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.