Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Special Bus Service: दिवाळीत लालपरीची तुफान कमाई! अवघ्या १६ दिवसांत एसटीच्या तिजोरीत ५४८ कोटींचा महसूल

Diwali Special Bus Service: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लालपरीला प्रवाशांनी मोठी पसंती दिली आहे. अवघ्या १६ दिवसांत एसटी महामंडळाने ५४८ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या परतीच्या प्रवासादरम्यान एकाच दिवसात ४६.५३ कोटी रुपयांची कमाई झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 17, 2026 | 04:59 PM
दिवाळीत लालपरीची तुफान कमाई! अवघ्या १६ दिवसांत एसटीच्या तिजोरीत ५४८ कोटींचा महसूल

दिवाळीत लालपरीची तुफान कमाई! अवघ्या १६ दिवसांत एसटीच्या तिजोरीत ५४८ कोटींचा महसूल

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीत एसटीच्या लालपरीला प्रवाशांची विक्रमी पसंती!
  • अवघ्या १६ दिवसांत ५४८ कोटींचे उत्पन्न;
  • दिवाळीच्या परतीच्या प्रवासात एकाच दिवसात ४६.५३ कोटींची विक्रमी कमाई!
मुंबई : दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासह परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लालपरीला भरभरून पसंती दिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या १६ दिवसांत एसटीने तब्बल ५४८ कोटी २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, दररोज सरासरी ३४ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी परतीच्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे एसटीने एकाच दिवसात ४६ कोटी ५३ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवण्याचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. (Diwali Special Bus Service)

एसटीच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम

ऑक्टोबर महिन्यात महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीतील सक्तीमुळे तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण, सलग सुट्ट्या, प्रवाशांची वाढलेली संख्या आणि महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीत देण्यात आलेली शिथिलता यामुळे एसटीच्या उत्पन्नाला मोठी चालना मिळाली आहे.

Illegal Tree Cutting: शेवगाव वृक्षतोड प्रकरण तापले! वनाधिकाऱ्यांचे लाकूडमाफियांशी साटेलोटे? तृप्ती देसाई आक्रमक

दिवाळी हंगामातील महत्त्वाचा निर्णय

यंदाच्या दिवाळी हंगामातील आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे दरवर्षी गर्दीच्या हंगामात आकारली जाणारी हंगामी भाडेवाढ यंदा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सणासुदीच्या काळातही प्रवाशांना नेहमीच्याच तिकीट दरात प्रवास करता आला. खासगी वाहतुकीच्या तुलनेत सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय म्हणून एसटीने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.

https://t.co/R5SpTzE4HY — Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) November 17, 2026


एसटीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्यातील तमाम प्रवाशांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या एसटी महामंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक यांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

प्रवाशांचा विश्वास आणि एसटी कर्मचाऱ्यांचे परिश्रम यांच्या बळावर लालपरीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. दिवाळीतील हा विक्रमी प्रतिसाद म्हणजे एसटीवरील जनतेच्या अढळ विश्वासाची पावतीच ठरली आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Mumbai University : सिनेट सदस्य प्रदिप सावंत यांना कारणे दाखवा नोटीस; शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आक्रमक, मुंबई विद्यापीठाला विचारला

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीत एसटी महामंडळाने किती उत्पन्न मिळवले?

    Ans: दिवाळीच्या काळात अवघ्या १६ दिवसांत एसटी महामंडळाने ५४८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले.

  • Que: एसटी महामंडळाने एका दिवसात किती विक्रमी कमाई केली?

    Ans: दिवाळीच्या परतीच्या प्रवासादरम्यान एसटी महामंडळाने एकाच दिवसात ४६.५३ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले.

  • Que: एसटीच्या विक्रमी उत्पन्नाबद्दल कोणी प्रवाशांचे आभार मानले?

    Ans: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांचे मनःपूर्वक आभार मानले.

Web Title: Diwali special bus service msrtc st bus record revenue diwali 548 crore sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST Tirthatan Yojna: एसटीच्या ‘संगे तीर्थाटन’ योजनेतून देवदर्शनासह पर्यटनाची संधी; नोव्हेंबरमध्ये विशेष सहलींचे नियोजन
1

ST Tirthatan Yojna: एसटीच्या ‘संगे तीर्थाटन’ योजनेतून देवदर्शनासह पर्यटनाची संधी; नोव्हेंबरमध्ये विशेष सहलींचे नियोजन

NCMC स्मार्ट कार्ड अन् ई-बसमुळे एसटीच्या उत्पन्नाला ब्रेक; अमरावती विभागाला १.८८ कोटींचा फटका
2

NCMC स्मार्ट कार्ड अन् ई-बसमुळे एसटीच्या उत्पन्नाला ब्रेक; अमरावती विभागाला १.८८ कोटींचा फटका

ST Employees : एसटीतील कंत्राटी भरतीविरोधात एल्गार! श्रीरंग बरगे यांचा सरकारला थेट इशारा
3

ST Employees : एसटीतील कंत्राटी भरतीविरोधात एल्गार! श्रीरंग बरगे यांचा सरकारला थेट इशारा

Pratap Sarnaik: पर्यटकांच्या वाहनांचा प्रश्न सुटणार! महाबळेश्वरमध्ये एसटी आगारात भव्य वाहनतळ उभारण्याचा मार्ग मोकळा
4

Pratap Sarnaik: पर्यटकांच्या वाहनांचा प्रश्न सुटणार! महाबळेश्वरमध्ये एसटी आगारात भव्य वाहनतळ उभारण्याचा मार्ग मोकळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.