Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Murder Case: डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीतील ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात…

 Murder Case: चिपळूणच्या वालोपे भागात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या! रात्री घरातून बाहेर पडलेला तरुण रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने उडाली खळबळ... फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाकडून कसून शोध सुरू!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 17, 2026 | 04:38 PM
 Murder Case: डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीतील ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात...

 Murder Case: डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीतील ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात...

Follow Us
Follow Us:
  • ३३ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या
  • सोमवारी रात्री घराबाहेर पडलेला नवनाथ घरी परतलाच नाही
  • आरोपीच्या शोधासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण केले
Murder Case: चिपळूणमधील वालोपे भागामध्ये एका तरुणाची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या नवनाथ कांबळे या तरुणाला डोक्यात दगड घालून ठार करण्यात आले आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून आणि कोणी केली, याचा कसून शोध चिपळूण पोलिसांकडून घेतला जात आहे. तपासासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

हेही वाचा: Kolhapur Crime: प्रोजेक्टच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नातेवाईकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल!

पोलिसांनी दिली घटनेची सविस्तर माहिती

चिपळूण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, सोमवारी सकाळी चिपळूण पोलीस स्टेशनच्या डायल ११२ वर एक कॉल आला होता. वालोप्यामध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळाली. त्यावरून डायल ११२ च्या अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन खात्री केली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर, वालोप्यामधील झुलाई जनरल स्टोअर्सच्या मागच्या बाजूला ३३ वर्षीय नवनाथ बबन कांबळे (मूळ रा. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले.

मृत तरुण बहिणीकडे राहत होता

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ कांबळे हा चिपळूणमध्ये आपल्या बहिणीकडे राहत होता. तो काल (सोमवारी, १६ नोव्हेंबर) रात्री नऊ वाजता घरातून बाहेर पडला होता, परंतु त्यानंतर तो घरी परतलाच नाही, असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तेथे जमलेल्या लोकांची चौकशी केली असता, त्याच्या बहिणीचे पती वालोप्यावरील रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावले असता, त्यांनी हा आपला मेहुणा नवनाथ कांबळे असल्याचे ओळखले. नवनाथला दारूचे व्यसन असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.

हेही वाचा: Pune Crime : ‘एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून’ दोन गटांत तुफान राडा; विटा-लाथाबुक्क्यांसह जोरदार दगडफेकीत दुचाकींचे नुकसान!

हत्येचे नेमकं कारण अज्ञातात

कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून नवनाथच्या डोक्याच्या बाजूला आढळलेल्या जांभा दगडाने त्याच्या डोक्यात मारून किंवा ठेचून त्याची हत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या गंभीर घटनेचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी तात्काळ जागेवर फॉरेन्सिक व्हॅन, श्वान पथक (Dog Squad) आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्याचे व लवकरात लवकर जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना चिपळूणमधील कोणत्या भागात घडली आहे?

    Ans: चिपळूणमधील वालोपे भागात रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर झुलाई जनरल स्टोअर्सच्या मागे ही घटना घडली.

  • Que: मृत पावलेल्या तरुणाचे नाव काय असून तो कोठला होता?

    Ans: नवनाथ बबन कांबळे (वय ३३) असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातील वांगी (ता. कडेगाव) येथील होता.

  • Que: पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करत आहेत?

    Ans: चिपळूण पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत असून, घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन, श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

Web Title: Chiplun valope navnath kamble murder case forensic investigation sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Chipalun News
  • Crime . Crime News
  • Murder Case
  • Sangali News

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: प्रोजेक्टच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नातेवाईकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल!
1

Kolhapur Crime: प्रोजेक्टच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नातेवाईकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल!

दौंड तालुक्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; पोलिसांनी केली अटक
2

दौंड तालुक्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; पोलिसांनी केली अटक

छाती, पोटावर चाकूचे वार अन् रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या
3

छाती, पोटावर चाकूचे वार अन् रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या

Sangali News: माधवनगर रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी गप्प का? नितीन शिंदेंचा सवाल
4

Sangali News: माधवनगर रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी गप्प का? नितीन शिंदेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.