Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HMPV Virus: आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर; कर्मचाऱ्यांचा सुट्ट्या रद्द अन् रूग्णालयात…, वाचा सविस्तर

HMPV विषाणूने भारतातही थैमान घातले आहे. भारतात आठ महिन्यांच्या मुलीला HMPV व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, कर्नाटकमध्ये HMPV ची 2 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 07, 2025 | 03:45 PM
HMPV Virus: आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर; कर्मचाऱ्यांचा सुट्ट्या रद्द अन् रूग्णालयात..., वाचा सविस्तर

HMPV Virus: आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर; कर्मचाऱ्यांचा सुट्ट्या रद्द अन् रूग्णालयात..., वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: कोविड -19 नंतर चीनमध्ये HMPV व्हायरसने थैमान घालायला सुरूवात केली. काल भारतातही या विषाणूचे चार-पाच रूग्ण आढळून आले. महाराष्ट्राती नागपूर जिल्ह्यात आज सकाळी दोन एचएमपीव्ही व्हायरसची लागण झालेल्या दोन रूग्णांची नोंद करण्यात आली. पण त्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. तर देशभरात देखील बंगळुरू आणि गुजरातमध्ये एचएमपीव्ही व्हायरासचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. दरम्यान राज्य सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विभगाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शासकीय जिल्हा रुग्णालयांमध्ये काही बेड राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच hpmv व्हायरस औषधांचा अतिरिक्त साठा तयार ठेवला जात आहे. हिंगोली आरोग्य विभागाने देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात 25 आयसीयू आणि 50 जनरल बेड राखीव ठेवले गेले आहेत.

राज्यात या व्हायरस बाबत खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभाग सावध झाला आहे. औषधांचा साठा वाढवला जात आहे. आयसीयू आई जनरल बेडसची संख्या वाढवली जात आहे. नागरिकांमध्ये मार्गदर्श तत्वे जारी केली जात आहेत. रूग्णालयांमध्ये पूढी दोन ते तीन महीने पुरेल इतका औषधांचा साठा केला जात आहे.

साथीच्या आजारांचे तज्ञ डॉ. रवी गोडसे यांनीदेखील या व्हायरला घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. एचएमपीव्ही रोगाचा भारताला फारसा धोका नसल्याचे डॉ. गोडसे यांनी म्हटले आहे. भारतातील नागरिकांना फारशी काळजी करण्याचे कारण नाही. चीनमध्ये सध्या नागरिक मास्क घालूनच फिरत आहेत. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र चीनमध्ये प्रदूषणाची समस्या मोठी असल्याने तेथील नागरिक कायमच मास्क घालून फिरत असतात. हा व्हायरस हा अत्यंत साधा आहे. कमी किंवा जास्त वय असलेल्या लोकांना हा व्हायरस होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉ. रवी गोडसे म्हणाले.

हेही वाचा: HMPV व्हायरसबाबत पुणे महापालिका अलर्ट; नायडू रुग्णालयात 300 बेड राखीव, परदेशातून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग होणार

HMPV व्हायरसबाबत महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

HMPV विषाणूने भारतातही थैमान घातले आहे. भारतात आठ महिन्यांच्या मुलीला HMPV व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, कर्नाटकमध्ये HMPV ची 2 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतासह अनेक देशांमध्ये HMPV संसर्ग आधीच पसरत आहे आणि विविध देशांमध्ये संबंधित श्वसन रोगांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारही सतर्क आहे. आरोग्य विभागाने एचएमपीव्ही संदर्भात लोकांना एक सूचना जारी केली आहे. लोकांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगण्यात आले आहे.

HMPV टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये…

1. शिंकताना किंवा खोकताना रुमाल आणि कापडाचा वापर करा.

2. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर वापरणे सुरू करा.

3. खोकला आणि सर्दी झालेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे.

हेही वाचा: HMPV व्हायरसचा भारतातील नागरिकांना कितपत धोका? काय म्हणाले डॉ. रवी गोडसे? वाचा सविस्तर

4. इतरांशी हस्तांदोलन थांबवावे लागेल.

5.एकच टिश्यू पेपर किंवा रुमाल पुन्हा पुन्हा वापरू नका.

6.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे बंद करावे.

7. कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास, स्वतःहून औषध सुरू करू नका.

8. वारंवार डोळे, नाक आणि कानाला स्पर्श करणे टाळा.

9. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा

Web Title: Due to hmpv virus maharashtra health department alert mode employee leave cancelled and increade beds at hospitals and medicines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • China
  • Maharashtra Health Department

संबंधित बातम्या

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?
1

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल
2

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे
3

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त
4

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.