Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Economy : तेलसंपन्न व्हेनेझुएलामधील चीनची पकड सुटली; भारताचा मात्र विजय, आता ट्रम्प यांनी दिली मोठी आनंदाची बातमी

India Venezuela: अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यावरील निर्बंध हटवले आहेत, असे अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने जाहीर केले. यामुळे व्हेनेझुएलामध्ये चीनचे स्थान आणखी कमकुवत होऊ शकते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 02, 2026 | 11:30 AM
india venezuela oil imports quadruple trump lifts sanctions china loses grip 2026

india venezuela oil imports quadruple trump lifts sanctions china loses grip 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनचा पत्ता कट, भारताचा ‘दबदबा’
  • ट्रम्प यांचा मोठा निर्णय
  • विक्रमी तेल आयात

India Venezuela oil imports 2026 : जागतिक राजकारणात आणि ऊर्जा क्षेत्रात भारताने एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. दक्षिण अमेरिकेतील तेलसमृद्ध देश व्हेनेझुएलामध्ये आता चीनची (China) मक्तेदारी मोडीत निघाली असून, भारताने तिथे आपला दबदबा निर्माण केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे भारताच्या तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी (Refineries) व्हेनेझुएलाच्या सोन्यासारख्या कच्च्या तेलाचे दरवाजे सताड उघडे झाले आहेत.

ट्रम्प यांचा ‘मास्टरस्ट्रोक’ आणि डेल्सी रॉड्रिग्ज यांची सत्ता

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात या वर्षाच्या सुरुवातीला झाली. ३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसवर धडक कारवाई करत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवले. त्यानंतर डेल्सी रॉड्रिग्ज यांनी व्हेनेझुएलाची सूत्रे हाती घेतली. आता, बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यावरील सर्व वैयक्तिक निर्बंध हटवण्याची मोठी घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की, आता व्हेनेझुएलाचे सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मुक्तपणे व्यवहार करू शकेल, ज्याचा थेट फायदा भारताला होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Strategy : असे थांबले युद्ध! अमेरिका-इराण युद्धाच्या अर्धवट समाप्तीमागे दडली आहेत ‘ही’ अब्जावधींचे 5 गुपिते, वाचा सविस्तर

चीनचा ‘गेम ओव्हर’, भारत बनला ‘किंग’

एकेकाळी व्हेनेझुएलाचे बहुतेक कच्चे तेल चीनला जात असे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे व्हेनेझुएला हतबल होता आणि चीन त्याचा फायदा घेत स्वस्तात तेल खरेदी करत असे. मात्र, सत्तापालट आणि ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. सागरी गुप्तचर संस्था ‘केप्लर’ (Kpler) च्या अहवालानुसार, मार्च महिन्यात भारताची व्हेनेझुएलातून होणारी तेल निर्यात तब्बल चौपट वाढली आहे. भारताने प्रतिदिन ८,९०,००० बॅरल तेल आयात करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. २०१९ नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे.

Indian refiners are emerging as the largest buyers of Venezuelan crude oil, filling the void left by former top importer China as it cuts purchases following the US’ move to control the Latin American nation’s oil sales. https://t.co/yykahDtz44 — Bloomberg (@business) April 1, 2026

credit – social media and Twitter

भारतीय कंपन्यांचा धडाका: रिलायन्स, HPCL आणि IOC आघाडीवर

इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पश्चिम आशियात (Middle East) ऊर्जा पुरवठ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने वेळीच पावले उचलत व्हेनेझुएलाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मार्च महिन्यात भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOC) या कंपन्यांनी व्हेनेझुएलाच्या तेलाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. या कंपन्यांनी प्रतिदिन सरासरी ३,४३,००० बॅरल तेलाची उचल केली आहे.

डायल्यूएंट्सचा वापर आणि तेलाचा ओघ

व्हेनेझुएलाचे कच्चे तेल हे अत्यंत जड आणि डांबरासारखे असते. ते पाईपलाईनमधून वाहण्यासाठी ‘डायल्यूएंट्स’ (Diluents) नावाचे पातळ करणारे पदार्थ लागतात. व्हेनेझुएलाने आता मोठ्या प्रमाणावर डायल्यूएंट्सची आयात सुरू केली आहे, ज्यामुळे तेल उत्पादन आणि निर्यात वेगाने वाढत आहे. कॅरिबियन बेटांवरील (बहामास, कुराकाओ) साठवण टाक्यांमधून आता हे तेल थेट भारताच्या बंदरांकडे रवाना होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Border Tension: ‘ड्रोन तर वाचलं, पण तुमचं काय?’ पाकिस्तानच्या नापाक कृत्यांनंतर भारतीय लष्कराचा संतापजनक इशारा

 भारताच्या ऊर्जेच्या गरजांना नवी दिशा

ट्रम्प यांचा हा निर्णय भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे केवळ चीनचे वर्चस्व कमी झाले नाही, तर भारताला आपली ऊर्जा सुरक्षा (Energy Security) अधिक मजबूत करण्याची संधी मिळाली आहे. इराण युद्धाच्या सावटाखाली असताना व्हेनेझुएलाचा हा तेलपुरवठा भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘संजीवनी’ ठरू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाबाबत कोणता मोठा निर्णय घेतला आहे?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यावरील अमेरिकेचे निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत.

  • Que: भारताच्या तेल आयातीत मार्च महिन्यात किती वाढ झाली?

    Ans: मार्च महिन्यात व्हेनेझुएलातून भारताला होणारी तेल निर्यात चौपट वाढली असून ती प्रतिदिन ८,९०,००० बॅरलवर पोहोचली आहे.

  • Que: चीनला या घडामोडीमुळे काय फटका बसला आहे?

    Ans: पूर्वी व्हेनेझुएलाचे बहुतेक तेल चीनकडे जात होते, मात्र आता भारताने चीनला मागे टाकून व्हेनेझुएलाच्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार होण्याचा मान मिळवला आहे.

Web Title: India venezuela oil imports quadruple trump lifts sanctions china loses grip 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • India news
  • Venezuela

संबंधित बातम्या

‘नेतन्याहू माझ्यामुळेच जिवंत…!’ ट्रम्प यांचे इस्रायलच्या अस्तित्त्वार मोठे विधान; माजी अध्यक्ष ओबामांवर साधला निशाणा
1

‘नेतन्याहू माझ्यामुळेच जिवंत…!’ ट्रम्प यांचे इस्रायलच्या अस्तित्त्वार मोठे विधान; माजी अध्यक्ष ओबामांवर साधला निशाणा

War Update : ‘आता तुमचं तुम्ही बघा!’ ट्रम्प यांनी जगाला दिला स्पष्ट संदेश; इराण युद्धातून अमेरिकेची माघार की नवी रणनीती?
2

War Update : ‘आता तुमचं तुम्ही बघा!’ ट्रम्प यांनी जगाला दिला स्पष्ट संदेश; इराण युद्धातून अमेरिकेची माघार की नवी रणनीती?

US Iran War: ‘हे’ साफ खोटं आहे! इराणचा पलटवार; ओव्हल ऑफिसमधील ट्रम्पच्या ‘त्या’ भाषणाने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष
3

US Iran War: ‘हे’ साफ खोटं आहे! इराणचा पलटवार; ओव्हल ऑफिसमधील ट्रम्पच्या ‘त्या’ भाषणाने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष

Oil Crisis: अंधारात बुडालेल्या क्युबासाठी तेल पाठवून रशिया बनला ‘तारणहार’; ट्रम्पची परवानगी पण Cuba राजवटीवर सडकून टीका
4

Oil Crisis: अंधारात बुडालेल्या क्युबासाठी तेल पाठवून रशिया बनला ‘तारणहार’; ट्रम्पची परवानगी पण Cuba राजवटीवर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.