Kirit Somaiya is the ganjadi of Tamasha; Criticism of Mumbai Mayor Kishori Pednekar
मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर वरळीतील गोमातानगर एसआरए प्रकल्पाबाबत गंभीर आरोप केले आहेत. यातील सहा गाळे किशोरी पेडणेकर यांनी हडपल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. त्यामुळं किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून, उद्या मुंबई पोलिसांसमोर किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे. दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपामुळं आपल्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
[read_also content=”उद्योग दुसऱ्या राज्यात जाताना शिंदे-फडणवीस सरकार झोपा काढत होते का? – नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/was-the-shinde-fadnavis-government-sleeping-when-the-industry-moved-to-another-state-nana-patole-340719.html”]
दरम्यान, किशोरी पेडणेकर यांच्या सासू श्रीमती विजया पेडणेकर यांचं काल (0३० ऑक्टोबर) रोजी निधन झालं. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. यानंतर आता किशोरी पेडणेकर यांनी आरोप केला की, किरीट सोमय्या यांनी SRA घोटाळ्याबाबत केलेल्या आरोपानंतर चौकशी झाली होती. या आरोपांमुळे वयोवृद्ध विजया पेडणेकर यांनी धसका घेतला, व त्यातच त्यांचे निधन झाले, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे, सोमय्यांचा आरोपामुळं माझ्या कुटुंबातील एकाचा बळी गेल्या असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.