मुंबई : मेट्रो कारशे़ड वाद प्रकरणी सतत काही ना काही नवी माहिती समोर येत आहे. आता कांजुरमार्गमधील (Kanjurmarg) आरे कारशे़ड मधील (Metro CarShed ) जागेवर दावा सांगणारी याचिका विकासकानं मागे घेतल्याची माहिती आहे. शिंदे सरकारनं सत्तेत येताच कारशेड आरेमध्ये बांधण्याच्या निर्णयाला पुन्हा हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच कांजुरच्या कारशेडच्या जागेवर दावा सांगणारी याचिका विकासकानं मागे घेतली आहे.
[read_also content=”प्रियांका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण https://www.navarashtra.com/latest-news/priyanka-gandhi-infected-with-corona-for-the-second-time-nrgm-314199.html”]
मेट्रो कारशे़ड संबधी अनेक वादविवाद झाले. मेट्रो कारशे़ड आरे मध्ये उभारण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयाला महाविकास आघाडीनं सरकारनं बदलत मेट्रो-3 चं कारशेड कांजुरमधील जागी उभारण्यास मंजुरी दिली होती. मात्र ही जागा मिठागरांची असून, मविआ सरकार आणि एमएमआरडीए इथं बेकायदेशीरपणे काम करत असल्याचा दावा करत, विकासक गरोडिया यांनी मुंबई दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता नवीन सरकारनं पुन्हा जुनाचं निर्णय कायम ठेवल्यानंतर विकासक गरोडियांनी ही याचिका मागे घेतली आहे.
[read_also content=”आरेमधील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निर्णयाकडे पर्यावरणप्रेमींच लक्ष https://www.navarashtra.com/maharashtra/supreme-court-hearing-today-on-tree-felling-in-aarey-nrps-314176.html”]
कांजूरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या जागेवर दावा करणारी याचिका मुंबई (Mumbai) शहर दिवाणी न्यायालयातून विकासक गरुडिया यांनी मागे घेतली आहे. कांजूरमार्गची ती जागा मिठागरांचीच असून राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (MMRDA) तिथं बेकायदेशीरपणे काम सुरू केल्याचा आक्षेप घेत या जागेवर दावा करत ही याचिका गरुडिया यांनी दाखल केली होती. त्यानंतर या कोर्टात ही याचिका प्रलंबित असल्याचा दावा करत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात हायकोर्टातही या विकासकानं याचिका दाखल केली होती.