साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला बाजारामध्ये आंब्यांना मोठी मागणी असते. कोकणातील हापूस आंब्याची जगभरात ओळख असल्याने भारतासह परदेशातही आंब्याला मोठी मागणी आहे. निफाड बाजारामध्ये हळूहळू आंबे येण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर आंब्यांचा सीजन असतो. मात्र यंदा बाजारात कमी प्रमाणात आंबा दाखल झाला आहे.
आंब्याचे माहेरघर असलेल्या कोकणात वातावरणामध्ये बदल झाल्याने अवकाळी पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसाचा फटका फळ बागांना बसला. त्यामुळे बाजारात अजूनही कमी प्रमाणात आंबे दाखल झाले आहेत. कर्नाटकात अवकाळी पाऊस पडल्याने फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा बाजारात हवीतशी आंब्यांची अवाक झालेली नाही. भाव वाढल्याने ग्राहकांना आंबा विकत घेण्यास परवडत नसल्याचे चित्र आहे.
सध्या बाजारामध्ये हापूस आंब्याची किंमत २५० ते ३०० रूपये डझन अशी आहे. तर निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, निफाड, लासलगावमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंबा बाजारात दाखल होणार आहे. सध्या बाजारामध्ये हापूस, लालबाग, बदाम, केशर आंब्यांची अवाक झाली आहे. हे आंबे प्रतिकिलो पायरी, राजापुरी, गावराण, लंगडा, दशेरी२०० ते ३०० रूपये डझन या दराने बाजारात उपलब्ध आहेत. पायरी, राजापुरी, गावराण, लंगडा, दशेरीहे आंबे अजूनही बाजारात उपलब्ध झालेले नाहीत, असे फळ विक्रेत्यांनी सांगितले आहे. बाजारामध्ये आंब्यांची अवाक होण्यासाठी अजून १० ते १५ दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याचा रस चाखताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. पिंपळगावमध्ये रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी आंब्याची दुकाने लावण्यात आली आहेत.
बाजारात आंब्याचे दर
हापूस : २५० ते ३०० रूपये
लालबाग : १५० रूपये
केशर : २०० रूपये
फळविक्रेते सचिन देव यांनी सांगितले आहे, सध्या आंब्याचे दर हे गुणवत्तेवर अवलंबून आहेत. कोकण व कर्नाटकातील हापूस आंब्याची आवक वाढत आहे. ग्राहक हापूस आंब्याचे अधिक दर असूनही खरेदी करत आहेत. दर तेजीत असले तरी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा खरेदीला ग्राहक प्राधान्य देतील, असे सचिन देव यांनी सांगितले.