
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
पीडित महिलेचा नाव प्रमिला रमेश मैना (६५) असे आहे. प्रमिला रमेश मैना या रेल्वे सेवेतून सन २०२० मध्ये सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेले २० लाख रुपये मिळाले. त्यांनी ते पैसे कॅनरा बँकेत जमा केले होते. प्रमिला या आपली मुलगी कृष्णा चंडालिया आणि जावई राजेश चंडालिया यांच्यासोबत राहत होत्या. जावई राजेश याने पैशांची गरज असल्याचे सांगून सासूकडे एक लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी प्रमिला मैना यांनी “बँकेतून काढून देते” असे सांगितले. यावर “तुमचे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत, काढता येणार नाहीत,” असे सांगून जावयाने त्यांची दिशाभूल केली.
यानंतर काही दिवसांनी पेन्शन काढण्यासाठी त्या बँकेत गेल्या. तेव्हा खात्यात त्यांना पुरेशी रक्कम नसल्याचे नजरेत आले. हा प्रकार मुलीला सांगितल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे देत आईला घराबाहेर काढून दिले. यांनतर महिलेने मोठ्या मुलीसोबत बँकेत जाऊन स्टेटमेंट काढले. यावेळी त्यांच्या अकाऊंटमधून दुसऱ्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे ट्रान्सफर झाल्याचं उघड झाले.
गुन्हा दाखल
जावई, मुलगी आणि नातवाने खोट्या सह्या करून खात्यातील पैसे परस्पर काढून घेतले होते असे लक्षात येताच पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे. याप्रकरणी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Palghar News: मुलं पळविण्याच्या संशयावरून चौघांचा घेराव; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला
Ans: जावई राजेश चंडालिया, त्याची पत्नी (पीडितेची मुलगी) आणि नातवाने.
Ans: सुमारे 20 लाख रुपये.
Ans: खोट्या सह्या करून वेगवेगळ्या खात्यांत पैसे ट्रान्सफर करण्यात आले.