Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेंभी नाका नवरात्रोत्सवाच्या मंडप पूजनावेळी शिंदे विचारे आमने सामने

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 09, 2022 | 02:40 PM
टेंभी नाका नवरात्रोत्सवाच्या मंडप पूजनावेळी शिंदे विचारे आमने सामने
Follow Us
Follow Us:

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Aanad Dighe) यांनी सुरु केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रोत्सव (Tembhi Naka Navratrotsav) सोहोळा संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे. शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर ठाण्यात टेंभी नाका नवरात्रोत्सवाचा मंडप पूजन सोहोळा पारपडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते हे मंडप पूजन पारपडले असून यावेळी ठाकरे समर्थक असलेले राजन विचारे आणि एकनाथ शिंदे एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शीत युद्ध पहायला मिळाले.

ठाण्याचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. आनंद दिघे यांना जाऊन २१ वर्ष उलटूनही त्यांनी ठाण्यात सुरु ठेवलेली नवरात्रोत्सवाची परंपरा आजतागायत ठाण्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते असलेले राजन विचारे आणि एकनाथ शिंदे जपत आले आहेत. यंदा टेंभी नाका नवरात्रोत्सवाचे ४२ वे वर्ष आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्यामुळे झालेल्या भूकंपानंतर विचारे आणि शिंदे यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिवसेने,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार पाडले.

शिवसेनेच्या तब्बल ५० आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भाजपशी हात मिळवणी करून भाजप आणि शिवसेनेचे नवीन सरकार स्थापन केले. मात्र शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणे पसंत केले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकदा ठाण्यात विविध कार्यक्रमांमध्ये आले, परंतु त्यावेळी ठाकरे गटात असेलेले राजन विचारे आणि समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्यापूर्वी संबंधित कार्यक्रमात उपस्थित रहायचे आणि शिंदे येण्यापूर्वी तेथून निघून जायचे, मात्र आज प्रथमच टेंभी नाका नवरात्रोत्सव मंडप पूजनावेळी शिंदे विचारे आमने सामने आले होते. यावेळी दोघांनी एकमेकांकडे पहाणं देखील टाळलं. यावेळी ठाकरे गटातील शिवसेनेचे जिल्ह्याध्यक्ष केदार दिघे देखील उपस्थित होते.

Web Title: During the tembhi naka navratri festival mandap pooja shinde vichare come face to face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2022 | 02:40 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • tembhi naka
  • thane

संबंधित बातम्या

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे
1

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश
2

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश

Badlapur News: ज्ञानेश कुमार यांची प्रतीकात्मक गाढवावरून धिंड; जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आंदोलन
3

Badlapur News: ज्ञानेश कुमार यांची प्रतीकात्मक गाढवावरून धिंड; जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आंदोलन

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
4

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.