Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दर्जावाढीसाठी ४०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यांतर्गत शाळांचे आधुनिकीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सुविधांचे सक्षमीकरण आणि नागरी विकासकामांना गती देण्यावर भर देण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 10, 2026 | 05:54 PM
ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! दर्जावाढीसाठी ४०० कोटींचा आराखडा; खासदार श्रीकांत शिंदेंचे निर्देश

ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! दर्जावाढीसाठी ४०० कोटींचा आराखडा; खासदार श्रीकांत शिंदेंचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • ठाणे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती
  • शाळांचे आधुनिकीकरण, आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी ४०० कोटींचे नियोजन
  • दिशा समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश
 

ठाणे : जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा, प्राथमिक आरोग्य सेवा आणि नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासदार आणि दिशा समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार व्यापक विकास आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील शाळांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी सुमारे ३०० कोटी रुपये, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दर्जावाढीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

यासोबतच शहरांचे सौंदर्यीकरण, सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण तसेच दलित वस्ती आणि झोपडपट्टी परिसरातील मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. या विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विविध कामांचे नियोजन, निधीची उपलब्धता आणि अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आवश्यक निधी आणि प्रशासकीय सहकार्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा समिती) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांनुसार हा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी डिजिटल शिक्षण सुविधा, इंटरनेट जोडणी, आधुनिक व सुसज्ज वर्गखोल्या, आदर्श स्वयंपाकगृहे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सक्षम शाळा अभियानांतर्गत शाळांच्या आवश्यकतेनुसार पुनर्बांधणी करून स्मार्ट शाळा विकसित करण्यात येणार आहेत.

शाळांच्या परिसरात सौरऊर्जा प्रकल्प, पावसाच्या पाण्याचे संकलन, विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार विश्रांतीगृहे तसेच शैक्षणिक आणि प्रेरणादायी चित्रांनी सजविलेल्या भिंती अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम पोषण) योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांना दर्जेदार भोजन मिळावे, यासाठी आदर्श स्वयंपाकगृहांच्या उभारणीवर भर देण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहेत.

शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी शहरांतील अनुभवी शिक्षकांसह शासकीय आणि खासगी क्षेत्रातील शिक्षकांचे सहकार्य घेण्याचे नियोजन आहे. प्रत्येक शाळेची अद्ययावत माहिती ठेवणे, दरवर्षी शाळांचे मूल्यमापन करणे आणि त्यानुसार आवश्यक सुधारणा करणे, यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या माध्यमातून आवश्यक निधीची उभारणी करून शाळांच्या आधुनिकीकरणाची कामे नियोजित पद्धतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

शहरांमधील नागरी सुविधांचा दर्जा उंचावतानाच सार्वजनिक जागांचा नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे वापर करता यावा, यासाठी विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रमुख रस्त्यांचे सौंदर्यीकरण, आकर्षक प्रकाशव्यवस्था, तलाव आणि उद्यानांचे सुशोभीकरण यांसह सार्वजनिक ठिकाणांचा कायापालट करण्यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे, त्यांची नियमित स्वच्छता राखणे आणि योग्य देखभाल सुनिश्चित करणे यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच उद्याने आणि सार्वजनिक जागांमध्ये व्यायामाच्या सुविधा विकसित करणे, सायकल मार्ग उभारणे, मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे, आधुनिक व्यायामशाळा उभारणे आणि विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये व अभ्यासिका उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या आहेत.

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुस्थितीतील पदपथ, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या विविध उपक्रमांसाठी महिला भवनांची उभारणी करणे, यांचाही आराखड्यात समावेश आहे. नागरिकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक ठिकाणी सुसज्ज सभागृहे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय दलित वस्ती आणि झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा, गटारे, पथदिवे आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत या भागांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.

MNS Activists : मीरा रोड Zepto स्टोअर मॅनेजरवर महिला कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीचे आरोप; मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

या सर्व विकासकामांचे नियोजन करताना नागरिकांच्या दैनंदिन गरजा, सुरक्षितता, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांचा प्रभावी वापर यांना प्राधान्य देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आवश्यक निधी आणि प्रशासकीय सहकार्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधांशी संबंधित विकासकामांना गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे आणि नियोजित कामे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

आरोग्य क्षेत्रासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा उंचावण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे केवळ प्राथमिक तपासणीपुरती मर्यादित न राहता नागरिकांना एकाच छताखाली आवश्यक आरोग्य तपासण्या, उपचार आणि मूलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी सक्षम केंद्रे म्हणून विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आरोग्य केंद्रांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता, रुग्णांसाठी आवश्यक सोयीसुविधा आणि उपलब्ध वैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित विभागाला दिल्या.

Web Title: Thane district 400 crore development plan for schools primary health centres mp shrikant shinde disha committee sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Infrastructure
  • School
  • thane

संबंधित बातम्या

Badlapur News: ज्ञानेश कुमार यांची प्रतीकात्मक गाढवावरून धिंड; जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आंदोलन
1

Badlapur News: ज्ञानेश कुमार यांची प्रतीकात्मक गाढवावरून धिंड; जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आंदोलन

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी
2

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
3

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
4

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.