Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर हे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाधानी असून पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

  • By विवेक
Updated On: Oct 09, 2026 | 08:46 PM
Gajanan Kirtikar

Gajanan Kirtikar

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटात जाण्याचं वृत्त निराधार – गजानन कीर्तिकर
  • “शिवसेनेला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार,” – कीर्तिकर
  • “कार्यकर्त्यांची कामं मार्गी लावण्यासाठी महिन्यातून किमान एक बैठक घ्यावी”
 

शिंदेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) हे नाराज असून लवकरच शिवसेना शिंदे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. तसेच, ते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आता मात्र यावर स्वतः गजानन कीर्तिकारांनी स्पष्टीकरण दिल असून पक्ष सोडण्याच्या चर्चाना त्यांनी पूर्णविराम दिला आहे.

कीर्तिकर यांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण समाधानी असल्याचं त्यांनी सांगितल.

गजानन कीर्तिकर ठाकरे गटात जाणार? चर्चांवर स्वतःच दिलं उत्तर

शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची आपली कोणतीही इच्छा नसल्याचं कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं. आपण पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या पाहून धक्का बसल्याचंही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी फोन करून विचारपूस केली होती. त्यावेळी आपण त्यांना वस्तुस्थिती सांगितल्याचं कीर्तिकर यांनी नमूद केलं.

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचं सांगत, शिवसेनेला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

एकनाथ शिंदेंकडे केली महत्त्वाची मागणी

गजानन कीर्तिकर यांनी पक्षातील संपर्कव्यवस्थेचा मुद्दाही उपस्थित केला. माजी खासदार म्हणून व्याधिग्रस्त आणि अन्यायग्रस्त लोकांची कामं करण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांशी संपर्क ठेवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

तातडीच्या कामांसाठी मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुखांशी संपर्क साधता आला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संपर्कातील अडचणी दूर करण्यासाठी व्यवस्था करण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं कीर्तिकर यांनी सांगितलं.

याशिवाय, महिन्यातून किमान एक बैठक व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. एनडीएचा घटक म्हणून काम करताना शिवसेना पक्षासाठीही पुरेसा वेळ द्यायला हवा, अशी सूचना आपण केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? कीर्तिकरांनी सांगितलं कारण

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना काँग्रेसधार्जिणी होत होती आणि पक्षाचा मराठी बाणा हरवत असल्याची भावना झाल्यामुळे आपण पक्ष सोडल्याचं गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.

दरम्यान, गजानन कीर्तिकर हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते असून ठाकरे गटाचे मुंबईतील नेते अमोल कीर्तिकर यांचे वडील आहेत. त्यामुळे ते पुन्हा ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं.

मात्र, आपण शिंदेंची शिवसेना सोडणार नसल्याचं कीर्तिकर यांनी स्पष्ट केल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पक्षातील नेत्यांशी नियमित संवाद आणि कार्यकर्त्यांच्या कामांसाठी प्रभावी संपर्कव्यवस्था असावी, हीच आपली अपेक्षा असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं.

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

Web Title: Gajanan kirtikar denies uddhav thackeray shiv sena return rumours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Gajanan Kirtikar
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
1

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले
2

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
3

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?
4

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.